विराट कोहलीच्या खळबळ उडवणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर बीसीसीआयने संवादाचा अभाव असल्याचा विराटचा दावा फेटाळून लावला आहे. टी-२० चे कर्णधारपद या विषयाबाबत सप्टेंबरपासून विराटशी बोलणे सुरु होते आणि ते कर्णधारपद सोडू नये यासाठी अशी विनंती त्याला करण्यात आली होती असं बीसीसीआयने स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या प्रतिनिधीचे नाव न जाहिर करता त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

सौरव गागुंलीचा ‘तो’दावा विराटने फेटाळला; म्हणाला, BCCI ने मला..

टी-२० चे कर्णधारपद या विषयावर संवाद नव्हता असं विराट म्हणू शकत नाही. या विषयावर सप्टेंबरमधे चर्चा झाली होती आणि टी-२० चे कर्णधारपद सोडू नये असंही त्याला सांगण्यात आले होते. मात्र एकदा कर्णधारपद सोडल्यावर खेळामधे एकाच प्रकारासाठी दोन कर्णधार असणे ही एक अवघड गोष्ट होती. चेतन शर्मा यांनी सकाळीच विराटला एकदिवसीय कर्णधारपदाच्या निर्णयाविषयी सांगितलं होतं, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी इंडिया टुडेला दिली आहे.

“..आणि ते म्हणाले आता तू एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील”,विराट कोहलीनं सांगितला ‘त्या’मीटिंगचा घटनाक्रम!

विराट कोहलीने आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं होतं. ही माहिती देतांना टी २०चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही असा खुलासा केल्याने एकच खळबळ उडाली होती. “माझ्यात आणि रोहितमध्ये कोणतीही अडचण नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी यावर स्पष्टीकरण देत आहे. या चर्चांमुळे मी आता थकलो आहे,” असा खुलासाही विराट कोहलीने पत्रकार परिषदमधे केला आहे.

Story img Loader