BCCI Annual Central Contract for Women Cricketers: बीसीसीआयने २०२२-२३ या वर्षासाठी भारताच्या महिला क्रिकेट खेळाडूंसाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये एकूण १७ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना सर्वोच्च ए- श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. एकूण ९ खेळाडूंना बी श्रेणीत आणि ५ खेळाडूंना सी श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआय ए- श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या महिला खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून ५० लाख रुपये देते. बी श्रेणीमध्ये उपस्थित असलेल्या खेळाडूंना ३० लाख रुपये आणि सी श्रेणीमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना १० लाख रुपये मानधन म्हणून दिले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, बीसीसीआयने हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांना महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराच्या यादीत प्रथम श्रेणी ए मध्ये ठेवले आहे, ज्यांना वार्षिक ५० लाख रुपये मिळतील. एकूण ५ खेळाडूंना ब श्रेणीत स्थान मिळाले असून त्यात रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, राजेश्वरी गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. बी श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक ३० लाख रुपये मिळतील. उरलेल्या ९ खेळाडूंना सी श्रेणी मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यात मेगना सिंग, देविका वैद्य, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, सबिनेनी मेघना, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल, यासिका भाटिया यांचा समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूंना १० लाख रुपये वार्षिक मानधन दिली जाईल.

माहितीसाठी की गेल्या वर्षीच्या करारानुसार, राजेश्वरी गायकवाड यांची ए श्रेणीतून बी श्रेणीत बदली करण्यात आली आहे. तर पूनम यादवला यंदा करारातून वगळण्यात आलेले आहे. याशिवाय पूजा वस्त्राकर बी मधून सी श्रेणीत गेली आणि एकूण ७ खेळाडूंना बीसीसीआयच्या वार्षिक करारामध्ये प्रथम स्थान मिळाले, ज्यात रेणुका ठाकूर, मेघना सिंग, देविका, सबिनेनी मेघना, अंजली सरवानी, राधा यादव, यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे.

पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेटच्या वार्षिक संपर्कात मोठा फरक

२६ मार्च रोजी बीसीसीआयने पुरुष क्रिकेटच्या खेळाडूंसोबत २०२२-२३ साठी वार्षिक करार जाहीर केला होता, ज्यामध्ये एकूण २६ खेळाडूंना स्थान मिळाले होते. पुरुषांच्या क्रिकेटचा विचार करता बीसीसीआयने ऐतिहासिक निर्णय घेतला होता की, महिलांना आता पुरुष खेळाडूंप्रमाणेच मानधन मिळेल, मात्र पुरुष खेळाडूंनुसार महिला खेळाडूंना कमी मानधन दिले जात आहे.

हेही वाचा: IPL 2023: वजन घटले, मानसिक स्थितीही ढासळली! रिंकू सिंगच्या पाच षटकरानंतर यश दयालची अवस्था खराब, कर्णधार हार्दिकचा मोठा खुलासा

पुरुष क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणीच्या आधीची श्रेणी म्हणजेच (ए+) मधील खेळाडूंना एक वर्षासाठी ७ कोटी रुपये, ए श्रेणीसाठी ५ कोटी, बी श्रेणीसाठी ३ कोटी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतील, तर महिला खेळाडूंची सुरुवातच ही ५० लाखापासून होते.

गेल्या एक वर्षात हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताची कमान सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. यानंतर भारतीय संघ टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळला. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा: WTC Final: योग्य सलामीवीर निवडण्याबाबत मायकल वॉनचा टीम इंडियाला सल्ला! म्हणाला, “इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे गृहित…”

ग्रेड-ए – हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा

ग्रेड-ब – रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, रिचा घोष आणि राजेश्वरी गायकवाड

ग्रेड-सी – मेघना सिंग, देविदा वैद्य, एस मेघना, अंजली शर्वानी, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल, यास्तिका भाटिया.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci released central contract list of women cricketers three players including captain harmanpreet in grade a avw