Hardik Pandya has been ruled out of the match against NZ: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. आता हार्दिक पांड्या उपचारासाठी एनसीएमध्ये जाणार आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली, त्यानंतर त्याला षटक मध्यभागी सोडून मैदान सोडावे लागले. आता हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हार्दिक पांड्याचा वैद्यकीय अहवाल पाहून माहिती दिली आहे.

बीसीसीआयने एक मीडिया निवेदन जारी करून सांगितले की, “टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला पुण्यातील एमसीए स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. अष्टपैलू खेळाडूला स्कॅनसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या सतत देखरेखीखाली असेल. २० ऑक्टोबरला तो संघासोबत धरमशालाला जाणार नाही आणि आता थेट लखनऊमध्ये होणाऱ्या सामन्यात भारतीय संघात सामील होईल, जिथे भारत इंग्लंडविरुद्ध खेळेल.”

Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
two wheeler rider senior citizen injured due to Manja
पुणे : जीवघेण्या नायलाॅन मांजामुळे ज्येष्ठ नागरिकांसह तिघे जखमी
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी

भारतीय संघाला मोठा धक्का –

विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पांड्याला वगळणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. हार्दिक फॉर्ममध्ये आहे आणि तो संघासाठी बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करतो. टीम इंडियाला वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून नेहमीच खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बाहेर पडणे हे संघासाठी चांगले लक्षण नाही. आता पांड्या लवकरात लवकर बरा व्हावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. जेणेकरून तो लवकरात लवकर संघात पुनरागमन करू शकेल.

Story img Loader