Rishabh Pant Fit To Play IPL 2024 : ऋषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता, ज्यामुळे तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्या भीषण अपघातानंतर त्याच्या कारकिर्दीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण काही आठवड्यांपूर्वी बातमी आली होती की ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून परतणार आहे. अलीकडेच, त्याच्या पुनरागमनाबद्दल पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती, परंतु आता बीसीसीआयने त्याच्या आणि प्रसिध कृष्णाच्या फिटनेसबाबत अपडेट जारी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंत फिट घोषित –

बीसीसीआयने ऋषभ पंतला फिट घोषित करताना एका निवेदनात सांगितले की, “३० डिसेंबर २०२२ रोजी उत्तराखंडजवळ रुडकी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर १४ महिन्यांच्या रिहॅब आणि रिकव्हरी प्रक्रियेनंतर, ऋषभ पंतला आता यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आगामी आयपीएल २०२४ च्या सामन्यांसाठी फिट घोषित करण्यात आले आहे.”

या दुखापतीमुळे पंतला २०२३ च्या आयपीएल हंगामाला मुकावे लागले होते, परंतु त्याचे चाहते त्याला सुमारे दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहू शकतील. कार अपघातानंतर ऋषभ पंतने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये रिहॅब आणि रिकव्हरी करण्यापूर्वी त्याच्या उजव्या पायात तीन अस्थिबंधन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या महिन्याच्या अखेरीस २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी हंगामापूर्वी पंतचे पुनरागमन दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठे प्रोत्साहन आहे.

हेही वाचा – IPL 2024 : ‘गुजरातला हार्दिकची उणीव भासणार नाही…’, माजी गोलंदाजाचे मोठं वक्तव्य

याआधी दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी सांगितले होते की, पंत फिट घोषित झाल्यास संघाचे नेतृत्व करेल. मात्र, बीसीसीआयची मान्यता असूनही २५ वर्षीय खेळाडू विकेट कीपिंग करेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ मध्ये पंत फक्त एक निव्वळ फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता असल्याचे पॉन्टिंगने संकेत दिले आहेत. मात्र बीसीसीआय सचिवांनी सोमवारी सांगितले होती की जर पंत विकेट कीपिंग करण्यासाठी सक्षम असेल, तर त्याला २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी संधी मिळेल.

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या म्हणण्यानुसार, ऋषभने एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करताना गेल्या काही आठवड्यात बंगळुरूमध्ये काही सराव सामने खेळले होते. यापैकी एका सामन्यात त्याने विकेट कीपिंग आणि फिल्डींग केला. त्याच्यासाठी आतापर्यंत फलंदाजी हा मुद्दा नव्हता. आतापर्यंत पंतसाठी फलंदाजी हा महत्त्वाचा मुद्धा राहिलेला नाही.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : ८ वर्षांच्या खंडानंतर रणजी विजयाकडे मुंबईची वाटचाल

त्याचबरोबर बीसीसीआयने भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद शमीबद्दलही अपडेट दिली आहे. गेल्या महिन्यात कृष्णाच्या डाव्या बाजूच्या क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्यावर सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून निरीक्षण केले जात आहे आणि लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे रिहॅब सुरू होईल. आगामी आयपीएल २०२४ मध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही.

मोहम्मद शमीबद्दल अपडेट –

याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही आयपीएल २०२४ मधून बाहेर झाला आहे. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. बीसीसीआयने सांगितले की, “वेगवान गोलंदाजावर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याच्या उजव्या टाचेच्या समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याच्यावर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. तसेच तो आगामी टाटा आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसणार नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci secretary jai shah declared rishabh pant is fit for ipl 2024 while mohammed shami and prasidh krishna are unfit vbm