Jay Shah Big Announcement for Test Cricketer : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका शनिवारी पार पडली. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ६४ धावांनी सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिका ४-१ ने खिशात घातली. या ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडचा ४-१ असा पराभव करताच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय कसोटी संघासाठी मोठी घोषणा केली. आता कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मॅच फी व्यतिरिक्त पैसेही मिळणार असल्याचं बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटलं आहे. जय शाह यांनी एक ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहपर योजना’ जाहीर केली असून तिला कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना असे नाव देण्यात आले आहे.
जय शाहांची कसोटी संघासाठी मोठी घोषणा –
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले, “भारतीय पुरुष कसोटी संघातील खेळाडूंसाठी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू करताना मला आनंद होत आहे, ज्याचा उद्देश आमच्या प्रतिष्ठित खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करणे आहे.” २०२२-२३ हंगामापासून सुरू होणारी, ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ ही कसोटी सामन्यांसाठी १५ लाख रुपयांच्या विद्यमान मॅच फीच्या वर अतिरिक्त बक्षीस संरचना म्हणून काम करेल.”
हेही वाचा – IND vs ENG : पाचव्या कसोटीत भारताचा मोठा विजय, इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत मालिका ४-१ ने घातली खिशात
जय शाह यांनी सांगितले की, कसोटी सामन्याची फी १५ लाख रुपये आहे, परंतु जे खेळाडू एका हंगामात (प्लेइंग इलेव्हनमध्ये) ७५ टक्क्यांहून अधिक सामने खेळतील त्यांना प्रति सामना ४५ लाख रुपये मिळतील, तर जे सदस्य संघाचा भाग आहेत त्यांना प्रति सामना २२.५ लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, जो खेळाडू ५० टक्के म्हणजे सीझनमध्ये सुमारे ५ किंवा ६ सामने खेळेल, त्याला प्रति सामना ३० लाख रुपये मिळतील.
हेही वाचा – IND vs ENG 5th Test : शंभराव्या कसोटीत अश्विनची कमाल! कपिल देव यांना मागे टाकत केला खास पराक्रम
त्याचवेळी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, जर एखाद्या खेळाडूने ५० टक्के सामने खेळले (मोसमात ९ कसोटी सामने आहेत आणि त्यापैकी ४ किंवा त्याहून कमी सामने खेळले गेले आहेत) तर त्याला कोणतेही प्रोत्साहन मिळणार नाही. प्रत्येक सामन्यासाठी फक्त १५ लाख रुपये मॅच फी असेल.