BCCI to release INR 1 crore for Anshuman Gaekwad’s cancer treatment : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अंशुमन गायकवाड कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना ब्लड कॅन्सर असून ते लंडनमध्ये होते. ते आता बडोद्याला परतले आहेत. त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. भारताकडून खेळण्याबरोबरच त्यांनी संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. १९९७ ते १९९९ आणि पुन्हा २००० मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने एक कोटी रुपये देण्याची केली घोषणा –

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयला अंशुमन गायकवाडला आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने एक कोटी रुपये जारी करण्याचे निर्देश दिले. जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत जाहीर केली. याबाबत बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने माहिती दिली.

nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
nitin gadkari expresses important views about devendra fadnavis on social media
फडणवीसांच्या शपथविधीनंतर नितीन गडकरींनी मांडले मत… म्हणाले,…
DCM Eknath Shinde first Reaction
Eknath Shinde: “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Amit Shah likely to meet Eknath Shinde
Amit Shah : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याआधी अमित शाह एकनाथ शिंदेंची भेट घेणार? काय माहिती समोर?
There should be no political interference in municipal programs says MLA Sneha Dubey Pandit in vasai
आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा बविआला पहिला धक्का; “कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नको”, पालिका अधिकार्‍यांना ताकीद
I am happy to be Devendra Fadnavis s elder sister as he becomes Chief Minister again
देवेंद्र लहानपणापासून खोडकर पण…मोठी बहीण स्वाती फडणवीस साठे यांचा आठवणींना उजाळा
Baba Siddiqui murder case Lawrence Bishnoi gang key goon suspected of involvement Mumbai news
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण: लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या महत्त्वाच्या गुंडाचा सहभागाचा संशय

कपिल देव यांनी बीसीसीआयकडे केली होती मागणी –

अंशुमन गायकवाड कपिल देव ते सुनील गावसकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळले आहेत. बीसीसीआयने त्यांना मदत करावी, असे कपिल देव यांनी नुकतेच म्हटले होते. विश्वचषक विजेत्या कर्णधाराने म्हटले होते, मला आशा आहे की बोर्ड त्याची काळजी घेईल. आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. त्यामुळे अंशूला कोणतीही मदत मनापासून करावी. त्याने वेगवान गोलंदाजांचे खूप चेंडू आपल्या शरीरावप झेलले आहेत. आता त्याच्यासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा – ‘आता सगळेच विसरलेत…’, रोहित शर्माला कर्णधार बनवल्याने शिवीगाळ करणाऱ्यांना सौरव गांगुलीचे चोख प्रत्युत्तर

माजी सहकारी देखील मदत करत आहेत –

स्पोर्टस्टारमधील एका वृत्तानुसार, सुनील गावसकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांच्यासह अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू गायकवाड यांना मदत करण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी मित्र आणि कॉर्पोरेटशी संपर्क साधत आहेत. गायकवाड यांनी १९७४ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. त्यांनी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. १९७५ आणि १९७९ च्या वर्ल्ड कपमध्येही तो टीम इंडियाचा भाग होता.

Story img Loader