भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बीसीसीआयच्या निवड समितीच्या नवीन अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवड समितीच्या पदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये व्यंकटेश प्रसाद हे सर्वात कुशल क्रिकेटपटू ठरले आहेत. त्यांच्याकडे लवकरच नव्या निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआय नवीन समितीमध्ये मुख्य निवडकर्ता म्हणून टी२० तज्ञाच्या शोधात असल्याची चर्चा आहे.
वेंकटेश प्रसाद यांनी आपल्या कारकिर्दीत गोलंदाज म्हणून भारतासाठी ३३ कसोटी आणि १६१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या खात्यात २९० आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत आणि नवीन निवडकर्त्यांच्या पदासाठी अर्ज करणारा तो सर्वात अनुभवी क्रिकेटर आहे. बीसीसीआयच्या जवळच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, या महिन्याच्या अखेरीस नवीन निवड समिती अंतिम केली जाईल आणि त्याची घोषणा केली जाईल. वेंकटेश प्रसाद हा या भूमिकेसाठी अर्ज केलेल्या सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसली तरी निवड समितीच्या अध्यक्षपदी व्यंकटेश प्रसाद यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे.
बीसीसीआयच्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले जात आहे की, “नवीन निवड समिती अंतिम केली जाईल. या महिन्याच्या अखेरीस नवीन निवड समितीची घोषणा केली जाईल. वेंकटेश प्रसाद हे सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहेत ज्यांनी या पदासाठी आपली नावे नोंदवली आहेत. यावर कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसली तरी नूतन अध्यक्ष म्हणून त्यांना सर्वांचा विश्वासदर्शक ठराव मिळण्याची शक्यता आहे.”
आयपीएलवर आगपाखड केली होती
प्रसाद यांनी आणखी एक ट्विट करून बीसीसीआयला सल्ला दिला आहे. “आयपीएल सुरू झाल्यापासून आम्ही एकही टी२० विश्वचषक जिंकलेला नाही आणि मागील पाच वर्षांत एखादी द्विपक्षीय मालिका जिंकण्याशिवाय मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील फारसे काही केले नाही. त्यामुळे भारतीय संघात बदल आवश्यक आहे.” बीसीसीआय निवडकर्ता म्हणून टी२० विशेषज्ञ शोधत आहे. बीसीसीआय चे देखील मत आहे की टी२० क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेला निवडकर्ता निवड समितीचा भाग असावा. निवडकर्त्याचा शोध आतापर्यंत पूर्ण झालेला नाही. अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षण नाईक यांचा समावेश असलेल्या नवीन क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) संक्षिप्त माहिती स्पष्ट आहे की ‘संघाची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून निवडकर्त्यांची निवड करणे’.
कशी असेल बीसीसीआय निवड समिती
व्यंकटेश प्रसाद यांनी दक्षिण विभागातून प्रतिनिधी म्हणून नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे पश्चिम विभागातून, सलील अंकोलाचे नाव बर्याच वेळा आले आहे. बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार यांचे पाठबळ मिळाल्यास भारताचा माजी वेगवान गोलंदाजाची निवड होऊ शकते पूर्व विभागातून ओडिशाचे एसएस दास निवडले जाऊ शकतात. उत्तर मधून मनिंदर सिंग, अतुल वासन आणि निखिल चोप्रा हेही स्पर्धेत आहेत नयन मोंगिया हे मध्य विभागातून संभाव्य निवडणुक म्हणून चर्चेत असलेले दुसरे नाव आहे.