दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ मार्चपासून सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आलेली आहे. २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. १५ सदस्यीय संघात सुनिल जोशी यांच्या निवड समितीने, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना संधी दिलेली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक टी-२० स्पर्धेत हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली होती. त्यातच रोहित शर्मा अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे शिखर धवनला आणखी एक संधी देण्यात आलेली आहे. या मालिकेसाठीही विराट कोहलीकडेच भारतीय संघाचं नेतृत्व असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी असा असेल भारताचा वन-डे संघ :
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल