भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त केली आहे. यासोबतच बोर्डाने निवडक पदासाठी नवीन अर्जही मागवले आहेत. यासाठी मंडळाने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. याअंतर्गत अर्जाची प्रक्रिया पुढे जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. आता कोणते माजी क्रिकेटपटू यासाठी अर्ज करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीसीसीआयने जाहीर केल्यानंतर एका चाहत्याने भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राला निवडकर्ता पदासाठी अर्ज करण्यास सांगितले.

मिलन नावाच्या सोशल मीडिया यूजरने ट्विटमध्ये लिहिले, आकाश तुम्ही अर्ज करू शकता. समालोचन करताना तुम्ही जे काही मुद्दे सांगता ते तुम्ही संघ निवडताना लक्षात ठेवू शकता. तसेच त्या आधारे तुम्ही एक चांगला संघ निवडू शकता.

Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

यावर आकाशनेही त्या यूजरला रिप्लाय दिला. त्याने लिहिले, ”हे पद मिळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. मात्र, यासाठी मी आता अर्ज करणार नाही, तर नंतर कधीतरी अर्ज करेल. सध्या हे पद माझ्यासाठी नाही.” डिसेंबर २०२० मध्ये चेतन शर्माला निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. यामध्ये चेतन शर्मा व्यतिरिक्त सुनील जोशी, हरविंदर सिंग, देबाशिष मोहंती यांचा समावेश होता. टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या महिन्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतरच नवीन निवड समिती स्थापन केली जाईल असे सांगितले होते. यासोबतच त्यांनी क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) स्थापन करण्याची घोषणा केली. सीएसीचे काम राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या निवड प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि देखरेख करणे असेल. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर क्रिकेट सल्लागार समिती निवडकर्त्यांचा आढावा घेईल आणि बोर्डाला अभिप्राय देईल, असेही जय शाह म्हणाले होते.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा पाहा कधी, कुठे, कसा, जाणून घ्या एकाच क्लिकवर

माजी खेळाडूचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे –

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय निवड समितीसाठी माजी खेळाडूंकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. निवड समितीमध्ये पाच पदे आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. अटींनुसार माजी खेळाडूचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. याशिवाय त्याने ७ कसोटी सामने खेळलेले असावेत किंवा ३० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. किंवा १० एकदिवसीय सामने आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. याशिवाय किमान पाच वर्षांपूर्वी ते निवृत्त झालेले असावेत. बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही क्रिकेट समितीचा पाच वर्षे सदस्य असलेल्या व्यक्तीला निवडीसाठी पात्र मानले जाणार नाही. अर्ज तपासल्यानंतर अर्जदारांची मुलाखत घेतली जाईल.

Story img Loader