भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय ) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे नीतिशास्त्र अधिकारी विनीत सरन यांनी रॉजर बिन्नी यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये २० डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
संजीव गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार विनीत सरन यांनी बिन्नी यांना नोटीस पाठवली आहे. तक्रारीत म्हटलं की, रॉजर बिन्नी यांची सून मयंती लॅगर बिन्नी या स्टार स्पोर्टसाठी काम करतात. स्टार स्पोर्टकडे भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत सत्राचे माध्यम अधिकार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विनीत सरन यांनी रॉजर बिन्नी यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ( हितसंबंध ) ची नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा : कहर! फलंदाजांच्या नादात पाकिस्तानी विकेटकीपरच दोन धावा पळाला; सामन्यातील मजेदार Video होतोय Viral
“तुम्हाला कल्पना देण्यात येत आहे. बीसीसीआय नियम ३९(२)(बी) नुसार नीतिशास्त्र अधिकाऱ्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीत तुम्ही नियम ३८ (१) आणि नियम ३८ (२) चे उल्लंघन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार ३० डिसेंबरपर्यत लिखित स्वरूपात तुमचे उत्तर देण्यात यावे,” असे विनीत सरन यांनी रॉजर बिन्नी यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीत म्हटलं आहे.
हेही वाचा : “संघ डरपोक…”, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने जस्टिन लँगरला दिले चोख प्रत्युत्तर
रॉजर बिन्नी यांची ऑक्टोंबर महिन्यात बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुली यांच्या जागी बिन्नी यांची निवड करण्यात आली. मयंती लॅगर बिन्नी या रॉजर बिन्नी यांच्या सून आहेत. स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती बिन्नी यांचे २०१२ साली लग्न झालं होतं. मयंती बिन्नी या स्टार स्पोर्टसाठी अँकर म्हणून काम करतात.