भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ख्रिस नेन्झानी यांना मालिकेसंदर्भात चर्चा करण्यासाठी औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी हारून लॉरगेट यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही.
‘‘मालिकेसंदर्भात चर्चेसाठी मी नेन्झानी यांना भारतात निमंत्रित केलेले आहे. या बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी स्थळ मुंबई किंवा चेन्नई असू शकेल. आम्ही लवकरच ही तारीख जाहीर करू,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. या बैठकीला लॉरेगेट उपस्थित राहणार का, या प्रश्नाला पटेल यांनी नकार दर्शवला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा तिढा सुटण्याची शक्यता
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे
First published on: 09-10-2013 at 03:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci set to discuss south africa tour with csa