Team India leaves for Dominica for 1st Test: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि भारत संघांत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडिया बार्बाडोसमधील सराव सामन्यानंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी डॉमिनिकाला रवाना झाला आहे. संघाला १२ जुलैपासून विंडसर पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ १ जुलैलाच बार्बाडोसला पोहोचला होता. संघाने तिथे जोरदार सराव केला आणि आता सामन्याचे ठिकाण असलेल्या डॉमिनिकाला रवाना झाला आहे. टीम इंडिया रवाना झाल्याचे फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर जण अडिडासच्या काळ्या ट्रेनिंग जर्सीत दिसत आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी मालिका होणार आहे. ज्यामध्ये दोन कसोटी सामने होतील. पहिला सामना १२ जुलैपासून तर दुसरा सामना २० जुलैपासून सुरू होईल. कसोटी मालिकेनंतर २७ जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना २७ तारखेला, दुसरा सामना २९ जुलैला आणि शेवटचा एकदिवसीय सामना १ ऑगस्टला होणार आहे. यानंतर टी-२० मालिकेला सुरुवात होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता कसोटी सामने सुरू होतील.
हेही वाचा – MS Dhoni: ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ गाणं गाताना दिसला धोनी, मोहित शर्माने शेअर केला VIDEO
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.