Ravindra Jadeja Interview: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा सामनावीर ठरला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली. या सामन्यानंतर अक्षर पटेलने बीसीसीआय टीव्हीवर रवींद्र जडेजाची मुलाखत घेतली. बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलाखतीची सुरुवात करताना अक्षर पटेल म्हणाला, ”मला माझा स्वतःचा चहल टीव्ही सुरू करावा लागेल असे दिसते. मीच पुन्हा पुन्हा माईक धरतोय. शमी आपल्यासोबत नागपुरात होते. आता सर रवींद्र जडेजा आले आहेत. मी बापू म्हणणार नाही, कारण आम्ही दोघेही बापू आहोत.”

अक्षर पटेल पुढे म्हणाला, “सर, मला गोलंदाजी येत नाही. अक्षरला गोलंदाजी द्यायची नाही, म्हणूनच अशी गोलंदाजी करताय का? मानसिकता काय असते? हे ऐकून रवींद्र जडेजा आधी हसला आणि मग म्हणाला, नाही, भारताकडे अशी विकेट असेल तर नक्कीच बरे वाटते, कारण स्पिनरची भूमिका वाढते आणि जबाबदारीही वाढते.”

जडेजा पुढे म्हणाला, “प्रयत्न राहतो की त्यांची फलंदाजी कशी आहे… ते स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे एकच प्रयत्न होता की स्टंप टू स्टंप बॉलिंग अधिक चांगली होईल. जर त्यांनी मिस केले तर चेंडू खाली राहील आणि स्टंपला लागेल. सुदैवाने असे घडले आणि पाचवेश स्टंपचा जोरात आवाज आला.”

अक्षर पटेल म्हणाला, “पण तुम्ही फक्त गोलंदाजी करत नाही तर फलंदाजीही करतीय. जेव्हा कठीण परिस्थिती होती आणि विराट भाईसोबत तुम्ही ५० धावांची भागीदारी केली होती, तेव्हा तुम्ही सामना कशा पद्धतीन पाहत होता आणि तुम्ही फलंदाजीच्या वेळी तो पाहिला नाही, मग अशा कठीण परिस्थितीत तुम्ही कोणत्या मानसिकतेतून जाता? रवींद्र जडेजा म्हणाला, त्यावेळी परिस्थिती थोडी कठीण होती, कारण ३-४ षटकांत ४ विकेट पडल्या होत्या. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देऊन भागीदारी करण्याचा हा प्रयत्न होता.”

हेही वाचा – PSL 2023: जमान खानने मलिंगा स्टाईलने जेम्स विन्सला केले क्लीन बोल्ड; फलंदाजही झाला चकीत, पाहा VIDEO

रवींद्र जडेजा म्हणाला, “या विकेटवर चांगला चेंडू केव्हाही पडू शकतो, अशी त्याची मानसिकता होती. पण स्वत:च्या बचावावर विश्वास ठेवून बॅट पॅडसमोर ठेवून जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करत होतो. मी आणि विराट शक्य तितके सरळ खेळण्याबद्दल बोलत होतो. कारण चेंडू तेवढा उसळत नव्हता. काही चेंडू खाली राहत होते.”

हेही वाचा – Indian Test team Vice-captain: केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर ‘या’ तीन खेळाडूंमध्ये चुरस, जाणून घ्या कोण आहेत?

अक्षर पटेलने हसत विचारले, “जसे तुम्ही ६ महिने ब्रेकवर होता. तर, तुम्ही घरी असा विचार करत होता की, तुम्ही निघाल्याबरोबर तुम्हाला थेट सर्वकाही वसूल करायचे आहे. गुजराती मनात हेच चालले होते का? हे ऐकून रवींद्र जडेजाही जोरात हसायला लागला, मग म्हणाला, हो यार, खरंच खूप क्रिकेट मिस केले. विश्वचषक हुकला. खूप मालिका हुकल्या. त्यामुळे ते थोडे होते. आशा आहे की हे असेच चालू राहील आणि टीम इंडिया जिंकत रहावी, मी, तू आणि अश्विन तिघेही मिळून, कारण भारतात फिरकीपटूची भूमिका वाढते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci shared a video of akshar patel interviewing ravindra jadeja on social media vbm