Mukesh Kumar calling his mother after his debut: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आर अश्विनच्या हस्ते त्याला पदार्पणाची कॅप मिळाली. मुकेशने ही बाब त्याने आपल्या आईला गावी फोन करुन सांगितली. तो तिच्याशी बोलताना भावूक झाला. बीसीसीआयने मुकेशचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे आणि त्याच्या आईचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले आहे.
आई, मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली –
भारताकडून कसोटी पदार्पण करणारा मुकेश कुमार ३०८ वा भारतीय ठरला आहे. त्यांनी आईला फोन करून ही माहिती दिली. मुकेशने आईला फोन करून सांगितले की, तू इतकी वर्षे जी पूजा-प्रार्थना करत होतीस, त्याचे फळ मला मिळाले आहे. आज मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. हे ऐकून आईने मुकेशला खूप आशीर्वाद दिला. त्याची आई म्हणाली बेटा तू खूप पुढे गेला आहेस. मुकेशने त्याच्या आईशी भोजपुरीत संवाद साधला.
फोनवर मुकेशची आई त्याला काय म्हणाली?
आईशी फोनवर बोलल्यानंतर मुकेशने सांगितले की, आईने मला सांगितले आहे की, तू नेहमी आनंदी राहा आणि पुढे जा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. मुकेश म्हणाला की आईला माहित नाही की भारताशी खेळणे ही किती मोठी गोष्ट आहे, पण ती फक्त एवढीच म्हणाली की तू पुढे जात रहा. मुकेश भावूक झाला आणि म्हणाला की हा क्षण पालकांसाठी खूप महत्त्वाचा असेल.
माझ्याकडे बोलायला काही शब्द नाहीत – मुकेश कुमार
मुकेश कुमार पुढे म्हणाला की, पदार्पण कॅप मिळणेही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, आज मी किती आनंदी आहे, हे मी सांगू शकत नाही. मी सकाळी पदार्पण केले आणि संध्याकाळी मी माझ्या आईशी बोलत आहे. मला काय बोलावे कळत नाही. मुकेश पुढे म्हणाले की, माझ्यासारखे अनेक खेळाडू छोट्या गावातून घर सोडून येतात आणि मोठ्या शहरांमध्ये त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतात.
हेही वाचा – IND vs WI 2nd Test: विराट कोहलीला भेटल्यानंतर ‘या’ खेळाडूच्या आईला अश्रू अनावर, VIDEO होतोय व्हायरल
बिहारचा मुकेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून क्रिकेट खेळलतो –
२९ वर्षीय मुकेश कुमार हा बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी आहे, परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. पदार्पणापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार गोलंदाजी केली आहे. मुकेश कुमार त्याच्या अचूक आणि स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. बंगाल संघात येण्यापूर्वी मुकेशला स्विंग किंवा सीमबद्दल फारशी माहिती नव्हती. गोपालगंजमधील त्याच्या सुरुवातीच्या प्रशिक्षकाने त्याला लेंथवर काम करण्यास सांगितले होते.