Ravichandran Ashwin kissing Mohammed Shami’s hand in the dressing room: एकदिवसीय विश्वचषका २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडवर भारताच्या दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मोलाचे योगदान दिले. शमीने या सामन्यात ७ विकेट घेतल्या. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंनी त्याचे ड्रेसिंग रूममध्ये जोरदार स्वागत केले आणि त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले. यावेळी ऑफस्पिनर आर अश्विननेही जाऊन शमीची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये दिसलेली जुगलबंदी वाखाणण्याजोगी होती.

अश्विनने शमीच्या हाताचे घेतले चुंबन –

वास्तविक, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोहम्मद शमी आणि अश्विनमधील अप्रतिम बाँडिंग पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये, संपूर्ण टीमने शमीचे अभिनंदन केले आणि अश्विननेही त्याच्याशी संपर्क साधला. यादरम्यान मोहम्मद शमीने अश्विनला सांगितले की, मी तामिळमध्ये उत्तर देऊन आलो आहे. शमीचे हे शब्द ऐकून अश्विनला आनंद झाला आणि त्याने लगेच शमीच्या हाताचे चुंबन घेतले.

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला युजवेंद्र चहल –

या व्हिडीओमध्ये संपूर्ण टीम एकमेकांना विजयासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहलही दिसत आहे. वास्तविक, सामना संपल्यानंतर चहल भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, जिथे संपूर्ण संघाने त्याचे गळा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी चहलला विराट कोहली, बुमराह, इशान, शार्दुल आणि सूर्यकुमार यादव भेटताना दिसत आहे. चहल हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आला होता. तो विश्वचषक संघाचा भाग नाही.

हेही वाचा – “विराट कोहलीचे दिवंगत वडील..”, युवराज सिंगची कोहलीसाठी भावुक पोस्ट; चाहते म्हणतात, “नशिबात..”

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांवर गारद झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तसेच श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुबमन गिलने नाबाद ८० धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.