Team India Arrives in Miami for 4th T20 Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मियामीला पोहोचले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बीसीसीआयने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू पहिल्यांदा विमानात असल्याचे दिसत आहेत. त्यानंतर ते विमानतळावर पोहोचले. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि युजवेंद्र चहल हे प्रवासाचा आनंद घेताना दिसले. व्हिडीओमध्ये गिल काहीतरी खाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आवेश खान, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि संजू सॅमसन देखील दिसत आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. यानंतर भारताने तिसरा सामना ७ गडी राखून जिंकला. आता चौथा सामना शनिवारी आणि पाचवा सामना रविवारी होणार आहे. हे दोन्ही सामने लॉडरहिल येथे होणार आहेत.
हेही वाचा – Sanju Samson: पाकिस्तानच्या माजी खेळाडूने संजू सॅमसला केला सवाल; म्हणाला, तू धावा कधी करणार?
विशेष म्हणजे, भारतीय फलंदाज तिलक वर्मा हा टी-20 मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. टिळक यांनी 3 सामन्यात १३९ धावा केल्या आहेत. निकोलस पूरन या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुरणने ३ सामन्यात १२८ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आहे. सूर्याने ३ सामन्यात १०५ धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने ३ सामन्यात ६३ धावा केल्या आहेत. आतापर्यंत मालिकेत त्याला विशेष काही करता आलेले नाही.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –
भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग. उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार