Jasprit Bumrah Practice in Nets Video: ११ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर ती वेळ आली आहे, ज्याची प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाट होती. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा भारतीय संघाच्या नेटमध्ये आपल्या घातक यॉर्कर चेंडूंचा पाऊस पाडताना दिसला. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या बुमराहने बुधवारी आपल्या पहिल्या सराव सत्रात भाग घेतला, जिथे तो आपल्या सहकारी फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बुमराह नेटमध्ये भारतीय फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने त्रास देताना दिसत होता. व्हिडिओमध्ये, बुमराहने उत्साहाने गोलंदाजी केली आणि त्याच्या घातक बाउन्सर आणि वेगवान गतीने फलंदाजांना त्रास दिला. बुमराहच्या गोलंदाजीच्या सरावाच्या व्हिडीओसह कॅप्शन असे लिहिले आहे की, “ज्या क्षणाची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो.”

मागच्या वर्षी बुमराह पाठीतील स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे सातत्याने मैदानाबाहेर होता, परंतु आगामी आशिया चषकापूर्वी त्याने पुन्हा तंदुरुस्ती मिळवली आहे. बुमराह डब्लिनमध्ये होणार्‍या टी-२० मालिकेने भारतीय संघात परतणार आहेच, पण त्याचे नाव निश्चित झाले आहे, पण तो आयर्लंड दौऱ्यावर भारताचे कर्णधारपदही सांभाळणार आहे. १८ ऑगस्टपासून मालिका सुरू होणार असल्याने, बुमराहला सामन्यासाठी आवश्यक असलेला सराव करण्याची संधीही मिळाली. चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मालिकेतील तीनही टी-२० सामने डब्लिनमध्ये खेळवले जातील.

हेही वाचा – Rishabh Pant: अपघातानंतर ऋषभचे मैदानावर पुनरागमन होताच टाळ्यांचा कडकडाट, फलंदाजीचा करतानाचा VIDEO व्हायरल

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई.

टी-२० मालिकेसाठी आयर्लंडचा संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, बेन व्हाइट, थिओ व्हॅन व्होरकोम, क्रेग यंग