Rinku Singh Video Share From BCCI: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. येथे भारताची युवा ब्रिगेड मैदानात उतरली आहे, तर वरिष्ठ खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. हे खेळाडू २३ ऑगस्टपासून बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षण शिबिरात भाग घेतील, तर दुखापतीतून परतणारा बुमराह आयर्लंडविरुद्ध युवा ब्रिगेडचे नेतृत्व करणार आहे. तत्पुर्वी बीसीसीआय रिंकू सिंग आणि जितेश शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयपीएलमध्ये खळबळ माजवलेल्या रिंकू सिंगलाही या दौऱ्यात संधी मिळाली आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, विमानातील बिझनेस क्लासमध्ये टीम इंडियाच्या जर्सीत बसणे अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर रिंकूने विमानात बसून आईशी संवाद साधला. ज्यामध्ये त्याने आपले आणि आईचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितले.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?

भारत शुक्रवारपासून डब्लिनमध्ये तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर रिंकू सिंग आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा यांच्यासोबतच्या खास चॅटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू सिंगने सांगितले की, भारतासाठी खेळणे हे त्याचे आणि आईचे खास स्वप्न होते, जे आता पूर्ण होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये रिंकू सिंगला विमानतळावर प्रवेश करण्यापासून ते फ्लाइटमध्ये चढण्यापर्यंत आणि नंतर आयर्लंडच्या थंड वातावरणात सराव करताना दाखवण्यात आले आहे. या मुलाखतीत जितेश एका अँकरची भूमिका साकारत आहे, जो रिंकू सिंगला आयपीएलचा सुपरस्टार म्हणून संबोधतो. यानंतर, तो त्यांना विचारतो की बिझनेस क्लासमध्ये बसून टीम इंडियाची जर्सी घालून परदेशात पोहोचणे कसे वाटते.

हेही वाचा – IND vs IRE T20: भारत आणि आयर्लंड मालिकेतील सामने, जाणून घ्या विनामूल्य कुठे आणि कधी पाहू शकता?

यावर उत्तर देताना रिंकू सिंग म्हणाला, “मला खूप बरे वाटत आहे आणि भारतासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. फ्लाइटमध्ये बसल्यावर मी आईला फोन केला. कारण माझ्या मुलाने भारतासाठी खेळावे असे आईचेही स्वप्न होते आणि आज तिचे आणि माझे स्वप्न पूर्ण होत आहे.” यानंतर रिंकू सिंगने आयर्लंडच्या थंड वातावरणात सराव करण्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, थोडी-थोडी थंडी लागत आहे आणि या हवामानात सराव करणे खूप चांगले आहे. भारतीय संघाने आपल्या युवा खेळाडूंना या दौऱ्यावर पाठवले आहे. रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनाही येथे पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

Story img Loader