Ravichandran Ashwin, IND vs WI: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या नावावर होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजला अश्विनच्या फिरकी गोलंदाजीसमोर तग धरता आला नाही आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ अवघ्या १५० धावांत गारद झाला. अश्विनने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. यासोबतच त्याने एक विशेष कामगिरीही केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आज ७०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. या शानदार कामगिरीनंतर बीसीसीआयच्या मुलाखतीत सूचक विधान केले आहे.
रविचंद्रन अश्विन म्हणाला की, “जेव्हा मी बार्बाडोसमध्ये आलो तेव्हा माझा मोठा जेटलॅग सुरु झाला. त्यानंतर मी टीएनपीएलमध्ये काही सामने खेळलो. त्यावेळी माझी शरीराची तंदुरुस्ती, बॉडी पोझिशन, बॉलिंग स्पीड, हाताची अॅक्शन अजिबात मला याचा अंदाज नव्हता. बार्बाडोसमधील पहिला सराव सत्रात मला थोडे चांगले वाटत होते. मात्र, त्यानंतर झालेल्या सराव सामन्यात मला फारसे काही चांगले वाटले नाही कारण मला अजून लय सांपडली नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ८-१० षटके टाकली त्यावेळी थोडे बरे वाटले. हा एवढ्या दिवसांचा खेळात पडलेला खंड, जेटलॅग, माझा खांदा, बॉलिंग स्पीड, चेंडूच्या दिशेने जाणारे शरीर यासर्व बाबींच मला खूप प्रेशर आलं होतं.”
पुढे बोलताना दिग्गज अश्विन म्हणाला की, “सामन्याआधी मी मला माहिती नव्हते की खेळपट्टी किती वळण घेणार आहे? त्यामुळे मी आधी सिमेंटच्या खेळपट्टीवर, सपाट सराव खेळपट्ट्यांवर खूप मेहनत घेतली. त्यानंतर मला आज कुठे हे यश मिळाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाला. आम्ही दोनवेळा अंतिम फेरी गाठली पण विजय मिळवू शकलो नाही. आम्ही खराब खेळ राहिला अन् ट्रॉफी आमच्यापासून दूर गेली. मी वेस्ट इंडिजविरूद्ध आज केलेली कामगिरी माझा आत्मविश्वास वाढवेल. जे मी आणि संघाने केले त्याचा मला आनंद आहे. मी जर रुसून बसलो तर युवा खेळाडू आणि माझ्यात काय फरक?” असे म्हणत त्याने टोमणा मारला. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.
वेस्ट इंडिजचे इंग्लंडमध्ये बरोबर नाही, हे अश्विनने दाखवून दिले
तोही एक काळ होता आणि आता वेस्ट इंडिजमध्ये जे दिसतं तीही एक परिस्थिती आहे. वेस्ट इंडिज समोर दिसल्यावर टीम मॅनेजमेंटने चटकन अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. फलंदाजी असो की गोलंदाजी, सध्याच्या संघात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात यापेक्षा चांगली आकडेवारी कोणाचीच नव्हती. आता संधी मिळाल्यावर अश्विनने पांढऱ्या जर्सी आणि लाल चेंडूत तो किती मोठा खेळाडू आहे हे दाखवून दिले. अश्विनने डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या ५ फलंदाजांची त्याने शिकार केली.
अश्विनने एका दगडात दोन पक्षी मारले
आता ज्या खेळाडूच्या खिशात असे विक्रम असतील त्याला प्रतिस्पर्धी संघ त्याला घाबरतील. वेस्ट इंडिजचीही अवस्था आता अशीच आहे. असो, अश्विन नेहमीच वेस्ट इंडिजविरुद्ध चांगला खेळला याचा इतिहास साक्षीदार आहे. डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेत त्याने नुकताच आपला विक्रम सुधारला आहे. असे करून, त्याने वेस्ट इंडिजला पराभवाकडे ढकलले आहे, तसेच अटीचा हवाला देऊन त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय संघ आणि व्यवस्थापनाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.