Team India Meets Sir Garfield Sobers and BCCI Share Video: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजला दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात १२ जुलैपासून कसोटी सामन्याने होणार आहे. पहिली कसोटी डॉमिनिका येथे खेळवली जाणार आहे. त्याचवेळी हा दौरा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटवर शेअर केला आहे.

सर गारफिल्ड सोबर्ससोबत भारतीय खेळाडूंच्या भेटीचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघ सध्या बार्बाडोसमध्ये आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्यांदा सर गारफिल्ड सोबर्सला भेटताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दिसत आहेत.

Mohammed Shami is not selected Border-Gavaskar Trophy Squad
Mohammed Shami : मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का निवड करण्यात आली नाही? जाणून घ्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Virat Kohli Tim Southee Fighting Video Goes Viral in India New Zealand 2nd Test Pune Watch
IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
IND vs NZ Washington Sundar clean bowled Rachin Ravindra and Tom Blundell video viral
IND vs NZ : वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी! कर्दनकाळ रचिन रवींद्र पाठोपाठ टॉम ब्लंडेलचाही उडवला त्रिफळा, पाहा VIDEO
Shikhar Dhawan Shared Hilarious Video of Laddu Mutya Baba Fans React Winner of The Trend
Shikhar Dhawan: “फॅन वाले बाबा की..”, शिखर धवनलाही ‘लड्डू मुत्त्या’ ट्रेंडची पडली भुरळ, Video वर कमेंट्सचा पाऊस
India Bowling Morne Markel Tunrs Net Bowler for KL Rahul Ahead of IND vs NZ 2nd Test Said Need To Remind Myself That I Am 40 Watch Video
VIDEO: “मी ४० वर्षांचा झालोय हे कळायला…”, केएल राहुलसाठी बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल झाला नेट बॉलर, पाहा काय म्हणाला?
Rohit Sharma Viral Video with Girl Fan Who Gives Message For Virat Kohli Said Tell Him i am His Big Fan IND vs NZ
Rohit Sharma: रोहित शर्माची स्वाक्षरी घेतल्यावर चाहतीचा विराटसाठी खास संदेश, विनंती ऐकताच कर्णधाराने…, VIDEO मध्ये पाहा काय घडलं?
Ayush Badoni picked up a sensational flying catch
Ayush Badoni : खेळाडू आहे की सुपरमॅन! आयुष बदोनीने घेतलेला चित्तथरारक झेल पाहून सर्वच अवाक्, पाहा VIDEO

यानंतर किंग कोहली व्हिडीओमध्ये पुढे दिसला. कोहलीने सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेऊन हस्तांदोलनही केले. कोहली आणि सर गारफिल्ड सोबर्स यांच्यात काही संवादही झाला. यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने शुबमन गिलची सर गारफिल्ड सोबर्सशी ओळख करून दिली. त्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर व्हिडीओमध्ये दिसला. यानंतर, शेवटी, आर अश्विन आणि राहुल द्रविड सर गारफिल्ड सोबर्सशी संवाद साधला. या व्हिडीओला कॅप्शन देताना बीसीसीआयने लिहले, “बार्बाडोसमध्ये आणि महानतेच्या सहवासात! टीम इंडिया या खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या सर गारफिल्ड सोबर्सला भेटली.”

कोण आहेत सर गारफिल्ड सोबर्स?

सर गारफिल्ड सोबर्स हे वेस्ट इंडिजच्या दिग्गज फलंदाजांपैकी एक आहेत. १९५४ ते १९७४ दरम्यान ते वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९३ कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. कसोटीच्या १६० डावात फलंदाजी करताना सर गारफिल्ड सोबर्स यांनी ५७.७८च्या सरासरीने ८०३२ धावा केल्या. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून २६ शतके आणि ३० अर्धशतके झळकली आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या ३६५* आहे.

हेही वाचा – Praveen Kumar Accident: माजी गोलंदाज प्रवीण कुमारच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कँटरची धडक, मुलासह थोडक्यात बचावला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भारत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.