Rinku Singh talking to Jitesh Sharma about his sixer skills : भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंग हा स्टार खेळाडू बनला आहे. प्रत्येक सामन्यानंतर रिंकूवरील संघाचा आत्मविश्वास वाढत आहे. गेल्या सामन्यातही रिंकूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार फलंदाजी केली होती. रिंकूने चौथ्या सामन्यात शेवटपर्यंत संघाचे धुरा सांभाळताना २९ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. या इनिंगमध्ये रिंकूच्या बॅटमधून ४ चौकार आणि २ षटकारही आले. रिंकूनेही रिव्हर्स शॉटमध्ये षटकार मारला, जो खूपच नेत्रदीपक आणि १०० मीटरचा होता. एवढा लांबलचक षटकार रिव्हर्स शॉटमध्ये मारणे सोपे काम नाही, त्यासाठी खूप शक्ती लागते. रिंकूने स्वतः सांगितले की तो हा षटकार कसा मारु शकला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयने शेअर केला रिंकूचा व्हिडीओ –

रिंकू सिंगची उंची कमी असेल, पण त्याच्या बॅटचा फटका सीमारेषेच्या बाहेर जातो. तो खूप लांब षटकारही मारतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताच्या विजयानंतर रिंकूला विचारण्यात आले की त्याच्याकडे इतकी ताकद कुठून येते, तो लांब षटकार कसा मारू शकतो? या प्रश्नाचे उत्तर रिंकूने स्वतः दिले आहे. असा प्रश्न भारताकडून चौथ्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या जितेश शर्माने विचारला. सामना जिंकल्यानंतर रिंकू आणि जितेश एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते, बीसीसीआयने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

जितेश शर्माच्या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू सिंग म्हणाला की, “काहीही नाही. तुम्हाला माहित आहे मी तुमच्याबरोबर जिमला जातो. मी सकस आहार घेतो. मला वजन उचलण्याची खूप आवड आहे, त्यामुळे माझ्यात नैसर्गिक शक्ती आहे.”

रिंकू आणि जितेशमध्ये पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीमुळे भारताला १७४ धावांपर्यंत मजल मारता आली. रिंकू सिंग तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा, आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळताना त्याने एकाच षटकात सलग ५ षटकार मारून कोलकात्याला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर सर्वांना रिंकूची ताकद कळू लागली, आता रिंकू ऑस्ट्रेलियाविरुद्धही तेच वादळ घेऊन येत आहे.

रिंकू सिंगने ९९ च्या सरासरीने केल्या धावा –

या मालिकेत रिंकू सिंगने चमकदार कामगिरी केली आहे. ४ सामन्यांच्या ३ डावात त्याने ९९ च्या सरासरीने ९९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १९०.३८ आहे. त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. रिंकूने ९ सामन्यांच्या ५ डावात ८७ च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत. त्याने केवळ ८८ चेंडूंचा सामना केला आहे. त्याने १६ चौकार आणि ११ षटकार मारले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० रविवारी बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci shares video of rinku singh talking to jitesh sharma about his sixer skills vbm
Show comments