वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेली टीम इंडिया घाम गाळताना दिसत आहे. अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने साउथॅम्पटनमध्ये सराव करत आहे. यावेळी संघ सदस्यांची दोन गटात विभागणी करून सराव सामना खेळला. एका संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर दुसऱ्या संघाचं नेतृत्व केएल राहुलच्या हाती सोपवण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली गोलंदाजी करताना दिसला. गोलंदाजीचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुलला गोलंदाजी करताना तो दिसत आहे. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी बीसीसीआयने क्रिकेटप्रेमींना एक प्रश्न विचारला आहे. या बॉलवर पुढे काय होणार? स्ट्रेट ड्राईव्ह, डिफेन्स, पायचीत असे पर्याय दिले आहेत. या प्रश्नाला नेटकरीही मजेशीर उत्तरं देत आहेत.

संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर विराटने केएल राहुलला स्विंग टाकल्याचं दिसत आहे. तर राहुलने हा चेंडू फटकवण्याऐवजी डिफेन्स करण्यावर समाधान मानलं. त्यामुळे अंतिम सामन्यात विराट कोहली गोलंदाजी करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. यापूर्वी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी केली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने एकूण ४ गडी बाद केले आहेत. तर आयपीएलमध्येही त्याने ४ गडी बाद केले आहेत.

Euro Cup 2020: बेल्जियमच्या रोमेलूने रशियाविरुद्ध पहिला गोल केला आणि कॅमेऱ्यासमोर म्हणाला…

भारतीय संघ वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा चषक आपल्या नावावर करण्यास आतूर आहे. त्याचबरोबर भारतीय संघाकडे २०१९ विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी देखील आहे. दरम्यान, विराट कोहलीने भारतीय संघाचं कर्णधारपद हाती घेतल्याननंतर अनेक सामने जिंकले आहेत. मात्र २०१३ सालानंतर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही.