माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. राहुल द्रविड या पदासाठी सुरुवातीला इच्छुक नव्हते. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविड यांची मनधरणी करून त्यांना पद स्वीकारण्यास सांगितलं. रवि शास्त्री यांचा टीम इंडियासोबतचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी २० वर्ल्डकपपर्यंतच होता. त्यानंतर आता राहुल द्रविड न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपासून मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ४० व्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक सोहळ्यात राहुल द्रविड यांच्या नियुक्तीबाबत सांगितलं.

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या निवडीवर तुमचा प्रभाव आहे का? असा प्रश्न सौरव गांगुल यांना विचारताच त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. “मला राहुल द्रविडच्या मुलाचा फोन आला आणि सांगितलं वडील खूप कडक वागतात. त्याला घेऊन जाण्याची गरज आहे. तेव्हाच मी राहुल द्रविडलला फोन केला आणि सांगितलं तुला राष्ट्रीय संघात जाण्याची वेळ आली आहे.”, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मजेशीर अंदाजात सांगितलं. द्रविड आणि त्यांच्यातील ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्ड मैत्रीमुळे संवाद कसा सुरळीत होता, हे सांगण्यास ते यावेली विसरले नाहीत. “आम्ही एकत्र वाढलो, एकाच वेळी सुरुवात केली आणि बहुतेक वेळ एकत्र खेळण्यात घालवला. त्यामुळे त्याचं स्वागत सहाजिकच होतं”, असंही सौरव गांगुली यांनी सांगितलं.

राहुल द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे मोठी जबाबदारी; बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी मन वळवून…

भारत पाकिस्तान सामन्यांवरही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपलं मत मांडलं. “भारत पाकिस्तान सामने खेळवणं हे, बीसीसीआयच्या हातात नाही. जागतिक स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशात सामने झालेले नाहीत. सरकारच यावर मार्ग काढू शकतं. हे रमीझ राजा आणि माझ्या हातात नाही”, असं सौरव गांगुली यांनी सांगितलं.

Story img Loader