आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) आपल्या सत्तेचा अंकुश ठेवणाऱ्या श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तिजोरीमध्ये पुढील आठ वर्षांत सहाशे दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भर पडेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.‘‘२०१५ ते २०१३ या आठ वर्षांमध्ये माझ्या अनुमानानुसार, बीसीसीआयला ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स नफा मिळेल,’’ असे पटेल यांनी सांगितले. या कालखंडात आयसीसीच्या महत्त्वाच्या तिन्ही समित्यांवर भारताला स्थायी स्थान असेल.

Story img Loader