आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये प्रतिनिधित्व वाढावे आणि देशातील पंचांचा दर्जा विकसित व्हावा, या हेतूने राष्ट्रीय पंच अकादमी स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आणि पंच उप-समितीचे प्रमुख रवी सावंत यांनी ही माहिती दिली. ‘‘देशात राष्ट्रीय पंच अकादमीची नितांत आवश्यकता आहे. देशातील पंचांचा दर्जा विकसित व्हावा, या उद्देशाने विभागीय स्तरावरसुद्धा या अकादमीची आवश्यकता आहे,’’ असे सावंत यांनी सांगितले. ‘‘सध्या आयसीसीच्या पॅनेलवर भारताचा एकही पंच नाही. भारतातमध्ये मूलभूत सुविधा आहेत, परंतु त्यांचा योग्य वापर करून पंचांना आणि सामनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात नाही,’’ असे सावंत पुढे म्हणाले.
बीसीसीआयची पंच उप-समिती : रवी सावंत (कार्याध्यक्ष), सुनील देव (उत्तर), सुधाकर राव (दक्षिण), राजेश वर्मा (पूर्व), देवेंद्र सोलंकी (पश्चिम), भगवानदास सुतार (मध्य), एस. वेंकटराघवन (संचालक), ए. व्ही. जयप्रकाश (निवृत्त कसोटी पंच), अनुराग ठाकूर (सचिव).

Story img Loader