ICC Cricket World Cup 2023 Updates: टीम इंडियाने आपल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मोहिमेला रविवारी (८ ऑक्टोबर) सुरुवात केली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने आले होते. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची किट परिधान करून मैदानात उतरणार असल्याचे वृत्त बीसीसीआयने नाकारले.
याआधी रविवारी, एका अहवालात दावा करण्यात आला होता की भारतीय संघ शनिवारी पाकिस्तानविरुद्ध पर्यायी किट वापरेल, ज्याचा नंतर युनेस्कोसाठी निधी उभारण्यासाठी लिलाव केला जाईल. मात्र, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की संघ रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात परिधान केलेली निळी जर्सी परिधान करेल.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया पर्यायी किट परिधान करणार असल्याच्या मीडिया रिपोर्ट्स आम्ही पूर्णपणे फेटाळून लावतो. या बातम्या पूर्णपणे निराधार आणि काल्पनिक आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये, मेन इन ब्लू टीम इंडियाच्या निळ्या रंगातच दिसणार आहे.”
किटमधील बदलासाठी आयसीसीची लागते मान्यता –
भारतीय संघाने विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच डच ऑरेंज ट्रेनिंग किट परिधान केले आहे. तेव्हापासून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघ केशरी रंगाची किट परिधान करेल, अशी अटकळ बांधली जात होती. तथापि, अशा कोणत्याही बदलासाठी आयसीसीची मंजुरी आवश्यक असते. संघांच्या किटचा रंग सारखा असेल तरच आयसीसीने यापूर्वी अशी मान्यता दिली आहे.
२०१९ च्या विश्वचषकात टीम इंडियाने भगवी जर्सी घातली होती –
होम आणि अवे जर्सी ही संकल्पना इंग्लंड आणि वेल्स यांनी आयोजित केलेल्या २०१९ विश्वचषकादरम्यान मांडण्यात आली होती. जर दोन संघांकडे एकसारख्या रंगाची जर्सी असेल, तर दुसरा संघ पर्यायी रंगाची एक जर्सी परिधान करुन उतरते. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्ध पिवळे टी-शर्ट घातले होते. त्याचबरोबर भारताला यजमान इंग्लंडविरुद्ध भगवे टी-शर्ट घालावे लागले होते.