BCCI New Chief Selector Salary: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अजित आगरकरची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून पारंपारिक विभागीय नियम तोडले आहेत. २००७ टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला आगरकर, निवड समितीच्या सर्व सदस्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या दृष्टीने वरिष्ठ आहे. अहवालानुसार, ते पद स्वीकारण्यास तो तयार नव्हता, परंतु त्याचे मन वळवण्यात बीसीसीआयला यश आले. यामागे दोन मोठी कारणे होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित आगरकरला कोचिंग आणि समालोचनातून मोठा पगार मिळत होता

वास्तविक, आगरकर आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे नियमित समालोचक आणि प्रशिक्षक होता. तो निवड समितीवर आल्यावर त्याचा पगार कमी झाला असता. तसेच, तो इतर व्यावसायिक कामातही व्यस्त होता. समालोचक आणि प्रशिक्षक म्हणून तो मुख्य निवडकर्त्यापेक्षा कितीतरी जास्त कमाई करू शकला असता. निवडकर्त्याचे सध्याचे वार्षिक पगार केवळ एक कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियात सामील होणे हा कठीण आणि आर्थिकदृष्ट्या तोट्याचा निर्णय होता.

हेही वाचा: WC 2023: शाहीन आफ्रिदीने वर्ल्डकप मधील भारत-पाक सामन्यावर केले मोठे विधान; म्हणाला, “टीम इंडियापेक्षा यावर लक्ष केंद्रित करा…”

अजित आगरकरला मुख्य निवडकर्त्याच्या पगारात तीन पटींनी अधिक वाढ मिळणार

क्रिकबझमधील वृत्तांवर विश्वास ठेवला तर, मुंबईकर आगरकरला पूर्वीच्या अनुभवांमुळे आणि त्याच्या मोठ्या नावामुळे निवड समितीचे प्रमुख म्हणून योग्य मानले जात असल्याचे समजते. शिवाय, बीसीसीआय तरुण निवडकर्त्याच्या शोधात होते आणि आगरकर ट्वेंटी-२० क्रिकेटही खेळला आहे. अशा स्थितीत तो संपूर्ण निकषात बसत होता. बीसीसीआयने अध्यक्षपदासाठीचे शुल्क वार्षिक एक कोटींवरून तीन कोटी रुपये करण्यावर सहमती दर्शवल्याचे समजते.

इतर निवडकर्त्यांच्या पगारातही मोठी वाढ होऊ शकते

दुसरीकडे, सध्या वार्षिक ९० लाख रुपये कमावणाऱ्या इतर चार निवडकांनाही वेतनवाढ मिळणार की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. बुधवारी निवड समितीची बैठक बोलावण्यात आल्याने नव्या अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या लगेच सुरू होतील. नवीन चेअरमन व्यतिरिक्त, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, श्रीधरन शरथ आणि अंकोला यांना कॅरिबियन आणि यूएस मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या T20I मालिकेसाठी संघाची निवड करायची आहे. याबरोबरच हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यासारखे काही कठोर निर्णयही मंजूर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Wimbledon 2023: रॉजर फेडरर निवृत्तीनंतर पहिल्यांदाच पोहोचला विम्बल्डनमध्ये, त्याच्या आठ ट्रॉफी चाहत्यांसोबत केल्या सेलिब्रेट; पाहा video

चेतन शर्मा हा मुख्य निवडकर्ता होता

विशेष म्हणजे अजितच्या आधी माजी दिग्गज खेळाडू चेतन शर्मा टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता होता. या पदावर ते बराच काळ राहिले, पण एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून मुख्य निवडकर्त्याचे पद रिक्त होते. अजित आगरकर सध्या सुट्टी साजरी करत आहेत. अशा स्थितीत ते पुढील आठवड्यात पदभार स्वीकारतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci triples salary of chief selector ajit agarkar will get rs 3 crores for month avw
Show comments