Hardik Pandya or Suryakumar Yadav as India T20I Captain: भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद कोण भूषवणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. तर रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पंड्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हार्दिकने रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे बीसीसीआय हार्दिकलाच भारताच्या टी-२० संघाचे कर्णधार घोषित करेल असे समजले जात आहे. पण याचदरम्यान आता एका अहवालात समोर आले आहे की बीसीसीआय हार्दिक पंड्याकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपण्यावर साशंक आहे, याचे कारणही समोर आले आहे.

हेही वाचा –VIDEO: “कर्णधारपद आणि प्रसिद्धी मिळताच विराट बदलला, पण रोहित…” अनुभवी फिरकीपटू नेमकं काय म्हणाला?

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Top leaders including Prime Minister Home Minister and Priyanka Gandhi are touring Vidarbha
गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,
minister chandrakant patil opinion on next cm in the loksatta loksamvad program
मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
mahayuti will win 160 seats in maharashtra assembly election 2024
पदाची लालसा नाही!‘लोकसत्ता’च्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा

बीसीसीआय आणि निवड समिती सदस्य सध्या हार्दिक पंड्याला त्याच्या फिटनेसच्या चिंतेमुळे कायमस्वरूपी T20I संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यावरून संभ्रमात आहेत. हा निर्णय घेताना दोन गट पडले असून त्यांच्यात या मुद्दयावर चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात भारताच्या विजयात पंड्याची महत्त्वाची भूमिका होती. पण त्याच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील त्याच्या गंभीर दुखापतींच्या इतिहासामुळे तो कर्णधार म्हणून संघाची धुरा कितपत सांभाळेल यावर प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. हार्दिक त्याच्या फिटनेसमुळे तो कसोटी संघाबाहेर आहे.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

Hardik Pandya त्याच्या दुखापतींमुळे भारताच्या महत्त्वाच्या मालिकांमधून बाहेर होऊ शकतो आणि याच कारणांमुळे बीसीसीआय कर्णधारपदाची धुरा पूर्णपणे त्याच्यावर सोपवण्यात कचरत आहे. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “हे एक नाजूक प्रकरण आहे. दोन्ही बाजूंकडून या विषयावर चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे सर्वजण एकमताने निर्णय घेऊ शकत नाहीयत. हार्दिकचा फिटनेस हा एक मुद्दा आहे पण त्याने भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात त्याने मोठी भूमिका बजावली आहे.”

हार्दिकवरून सुरू असलेल्या या सर्व चर्चांदरम्यान सूर्यकुमार यादव हा भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर टी-२० मध्ये भारताचा नंबर १ फलंदाज असलेल्या यादवने एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत आपले नेतृत्व कौशल्य दाखवले होते.

हेही वाचा – “BCCI ने तसं लिहून लिहून द्यावं…” PCBची मोठी अट, टीम इंडिया पाकिस्तानात येत नसल्यास काय करावं लागणार?

सूर्यकुमार यादवबद्दल सांगताना सूत्रांनी माहिती देत सांगितले की, “सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचं तर त्याच्या नेतृत्त्वाला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”

टी-२० कर्णधारपदाचा अंतिम निर्णय नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी विचारविनिमय करून केला जाईल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करताना गंभीरने सूर्यकुमार यादवसोबत काम केले आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय आणि निवड समिती या आठवड्यात गंभीरसोबत पहिली निवड बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लवकरच श्रीलंकेतील आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघांची घोषणा केली जाईल.