Rajeev Shukla responds to Gurmeet Singh Meet Hare’s allegations about ODI world cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने मंगळवारी (२७ जून) वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विश्वचषक स्पर्धेचे सामने भारतात १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. मात्र पंजाबच्या मोहाली क्रिकेट स्टेडियमचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही, ज्यावर पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत हेअर म्हणाले की, राजकीय हस्तक्षेपामुळे मोहालीला विश्वचषक सामने मिळाले नाहीत. त्यावर आता बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत ‘एनआय’ या वृत्तसंस्थेला निवेदन दिले. ते म्हणाले की, “पंजाबच्या मोहाली स्टेडियमला एकही विश्वचषक सामना दिला नाही. कारण सध्याचे स्टेडियम आयसीसीच्या मानकांची पूर्तता करत नाही आणि स्थळ ठरवताना आयसीसीची संमती अत्यंत महत्त्वाची आहे.”

पंजाबच्या क्रीडामंत्र्यांनी विधान केले होते की, “पंजाबच्या मोहालीला स्पर्धेच्या राजकीय हस्तक्षेपामुळे यजमान शहरांच्या यादीतून वगळण्यात आले. पंजाब सरकार हा मुद्दा बीसीसीआयकडे मांडणार आहे.”

हेही वाचा – TNPL 2023: आऊट होऊनही बचावला फलंदाज, अंपायरसह इतर कोणाच्याच लक्षात आली नाही मोठी चूक, पाहा VIDEO

राजीव शुक्ला म्हणाले, “विश्वचषक स्पर्धेसाठी १२ ठिकाणांची निवड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी गेल्या विश्वचषकात इतक्या ठिकाणांची निवड करण्यात आली नव्हती. या १२ ठिकाणांपैकी त्रिवेंद्रम आणि गुवाहाटी येथे सराव सामने होणार आहेत, तर उर्वरित ठिकाणी साखळी सामने होणार आहेत. आणखी केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दक्षिण विभागातून चार, मध्य विभागातून एक, पश्चिम विभागातून दोन, उत्तर विभागातून दोन. दिल्ली आणि धर्मशाला (उत्तर विभागात) येथे सामने होणार आहेत.”

द्विपक्षीय मालिका मोहालीला दिली जाईल –

बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणाले, “गेल्या वर्षी विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना मोहालीला देण्यात आला होता. मोहालीतील मुल्लानपूर स्टेडियम तयार होत आहे. जर ते तयार झाले असते तर त्यांना विश्वचषक सामना पाहायला मिळाला असता. मोहालीतील सध्याचे स्टेडियम आयसीसीच्या निकषांची पूर्तता करत नाही आणि त्यामुळे त्याला सामने दिले गेले नाहीत. पण असे नाही की त्यांना सामने दिले जाणार नाहीत.”

हेही वाचा – Natasha Stankovic: हार्दिक पांड्यासोबत पत्नी नताशा झाली रोमँटिक, कॅमेऱ्यासमोर अशी पोज दिली की चाहते म्हणाले…

राजीव शुक्ला पुढे म्हणाले, “द्विपक्षीय मालिकेचे सामने त्यांना दिले जातील, कारण ते रोटेशनल सिस्टमवर आधारित आहेत. कोणतेही ‘पिक अँड चॉइसिंग’ केलेले नाही. स्थळ निश्चित करण्यासाठी आयसीसीची संमती आवश्यक आहे. त्रिवेंद्रममध्ये प्रथमच सराव सामने देण्यात आले आहेत. असे नाही की कोणत्याही केंद्र/झोनकडे दुर्लक्ष केले गेले आहे. स्टेडियमची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे, अगदी नॉर्थ ईस्ट झोनमधील गुवाहाटी येथेही सामने झाले आहेत.”