पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीज राजा यांनी बीसीसीआयवर नवा हल्ला चढवला आहे. तो म्हणाला की जर भारतीय संघ आमच्यासोबत खेळत नसेल तर ती मोठी गोष्ट नाही. त्याच्याशिवायही आपलं क्रिकेट चालू आहे. जर पाकिस्तानला २०२३ मध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी नाकारली गेली तर पाकिस्तान पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकू शकतो, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्टोबरमध्ये दोन्ही क्रिकेट बोर्डांमधील तणाव सुरू झाला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खुलासा केला होता की टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुखही आहेत. जय शहा यांनीही ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पीसीबीने पुढील वर्षी आशिया चषकानंतर एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी दिली.

काय म्हणाले रमीज राजा?

रमीज राजाने शनिवारी स्काय स्पोर्ट्स क्रिकेटला सांगितले की, “आम्ही खरोखरच यावर चर्चा करू इच्छित नाही, परंतु चाहत्यांची इच्छा आहे की आम्ही प्रतिक्रिया द्यावी.” इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल आथर्टन यांच्याशी झालेल्या संभाषणात राजाने बीसीसीआयची भूमिका अन्यायकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की पीसीबी आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण बदलण्यास विरोध करेल.

हेही वाचा:   Sanju Samson: ‘या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाने सॅमसनला दिली अनोखी ऑफर, संजूचा निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

पाकिस्तानला भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळायची आहे

पीसीबी अध्यक्ष म्हणाले, “मला वाटते की सरकारचे धोरण आहे आणि ते येतील की नाही हे मला माहीत नाही. आशिया चषक म्हणजे चाहत्यांसाठी खूप काही आहे.” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू व्हायला हवी, असे पाकिस्तानचे माजी क्रिकेटरचे मत आहे. आम्हाला भारतात खेळायचे आहे आणि त्यांनीही पाकिस्तानात यावे. रमीज राजा म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून भारताशिवाय खेळत आहोत आणि पुढे जात आहोत. पाकिस्तानने अर्थव्यवस्था इतरांच्या तुलनेत व्यवस्थित सांभाळली आहे. ती पुढे कशी टिकवून ठेवायची हे आम्हाला चांगलेच कळते आणि तुमच्याकडून सल्ले घेण्याची गरज नाही.”

हेही वाचा:   INDW vs AUSW: “मुझसे इंस्पायर होके इतने लंबे छक्के…”; स्मृती मंधानाने ऋचा घोषची केली मस्करी, बीसीसीआयने शेअर केला Video

बीसीसीआयने संपूर्ण वाद सुरू केला : राजा

या संपूर्ण आशिया चषकाच्या चर्चेला रमीज राजाने बीसीसीआयला जबाबदार धरले. राजा म्हणाले की, पाकिस्तान सरकारने बाबर आझम अँड कंपनीला सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे प्रवास करण्याची परवानगी दिली नाही तर काय होईल? रमीज म्हणाले, “सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सरकारने पाकिस्तानी लोकांना भारतात येण्याची परवानगी दिली नाही तर? हा येथे अतिशय भावनिक विषय आहे. यावरून एक प्रकारे बीसीसीआयने वाद सुरू केला होता. यावर आम्हाला उत्तर द्यावे लागले. कसोटी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानची गरज आहे.असेही ते मागे म्हणाले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci vs pcb our cricket even without india pcb president ramiz raja lashed out at bcci again avw