भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेला विलंब करण्याचा आणि संघ संचालक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत शास्त्री यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन करावे, अशी त्यांना विनंती होण्याची शक्यता आहे.
चेन्नईत होणाऱ्या वित्त समितीच्या बैठकीत वार्षिक ताळेबंद आणि अन्य आर्थिक व्यवहारांना मंजुरी दिली जाईल. मग दुपारच्या सत्रात कार्यकारिणी समितीची बैठक होईल. मुकुल मुद्गल चौकशी समिती स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी आपला अंतिम अहवाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सादर करणार आहे. तोपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात यावी, या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा