ICC Revenue Share: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) महसूल वाट्यामध्ये ७२ टक्के वाढ मिळाली आहे. आयसीसीने गुरुवारी डर्बन येथील वार्षिक परिषदेत सदस्य मंडळांना महसूल वितरणास मान्यता दिल्यानंतर, शुक्रवारी जय शाह यांच्या ईमेलद्वारे राज्य संघटनांना विकासाची माहिती देण्यात आली. यामध्ये बीसीसीआयला आयसीसीच्या वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे ३८.५ टक्के रक्कम मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अलीकडेच बहुचर्चित सुधारित महसूल-वितरण मॉडेलला मंजुरी दिली, त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील चार वर्षांमध्ये ICC च्या वार्षिक निव्वळ कमाईच्या सुमारे ३८.५ म्हणजेच जवळपास ३९ टक्के कमवेल आणि वर्षाचे व्यावसायिक चक्र असणार आहे. बीसीसीआय २०२४ ते २०२७ पर्यंत वार्षिक US$ २३० दशलक्ष डॉलर कमवेल किंवा असे म्हणता येईल की बीसीसीआयला आयसीसीच्या अंदाजे वार्षिक US$ ६०० दशलक्ष कमाईपैकी ३८.५ टक्के मिळतील.

हेही वाचा: IND vs WI: “ये तो भट्टा फेंक…”, कॅरेबियन खेळाडूच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवर विराटचा आक्षेप? स्टंप माइकमध्ये कैद झाला आवाज

आयसीसीने डर्बनमधील नवीन वितरण मॉडेलला मान्यता दिली

ESPNCricinfoच्या मते, आयसीसीच्या इतर ११ पूर्ण सदस्यांपैकी कोणालाही बोर्डाच्या वार्षिक निव्वळ कमाईचा दुहेरी अंकी वाटा मिळणार नाही, दुसरीकडे ९० पेक्षा जास्त सहयोगी सदस्य दरवर्षी सुमारे US$६७.५ दशलक्ष डॉलर शेअर करतील. डरबनमध्ये झालेल्या आयसीसीच्या एजीएमच्या शेवटच्या दिवशी या वितरण मॉडेलला मान्यता देण्यात आली आहे. पाकिस्तानने याआधीही यावर आक्षेप घेतला होता, मात्र बैठकीत त्यांनीही सहमती दर्शवली आहे.

अहवालानुसार, आयसीसी वितरण मॉडेलच्या मसुद्यातील एकमेव बदल म्हणजे पाच पूर्ण सदस्य (क्रिकेट दक्षिण आफ्रिका, श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश क्रिकेट बोर्ड, न्यूझीलंड क्रिकेट आणि क्रिकेट वेस्ट इंडिज) दरवर्षी अंदाजे US$ एक दशलक्ष डॉलर कमावतात त्यात थोडीशी वाढ होईल.

हेही वाचा: IND vs WI: शतकवीर यशस्वी जैस्वालचे ड्रेसिंग रूममध्ये भव्य स्वागत, रोहितपासून द्रविडपर्यंत सर्वांनी केला सॅल्युट, पाहा Video

पीसीबीचा वाटा किती आहे?

दुसरीकडे, बीसीसीआय नंतर आयसीसीच्या नवीन मॉडेलमध्ये सर्वाधिक कमाई करणारे तीन सदस्य म्हणजे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB), क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB). आयसीसी वितरण मॉडेलच्या मसुद्यानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुक्रमे US$४१.३३ दशलक्ष (किंवा ६.८९%) आणि US$३७.३३ दशलक्ष (किंवा ६.२५%) डॉलर कमावणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ३० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमावण्याचा अंदाज आहे. माहितीसाठी, हे वितरण मॉडेल प्रथम आयसीसी टीमने तयार केले होते आणि नंतर प्रशासकीय समितीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार (F&CA) समितीने त्यावर काम केले आणि अंतिम रूप दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci will be rich the total percentage of iccs annual income will be more than six times that of ecb avw