ICC Revenue Distribution Model: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणखी श्रीमंत होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत त्याचा दर्जा आणखी वाढणार आहे. आयसीसीने पुढील ४ वर्षांसाठी तयार केलेल्या नवीन महसूल वितरण मॉडेल अंतर्गत, बीसीसीआय जागतिक क्रिकेटमध्ये एक पॉवरहाऊस म्हणून उदयास येणार आहे. या काळात आयसीसीच्या निव्वळ उत्पन्नाच्या जवळपास ४० टक्के रक्कम बीसीसीआयकडे येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, नवीन महसूल मॉडेलचा केवळ प्रस्तावच समोर आला आहे. परंतु, ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, या मॉडेलनुसार, बीसीसीआय २०२४-२७ दरम्यान दरवर्षी US $ 230 दशलक्ष (सुमारे १९०० कोटी रुपये) कमवू शकते किंवा बीसीसीआयचा आयसीसीच्या ५००० कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नात ३८.५ टक्के हिस्सा असेल.

पीसीबीपेक्षा ९ पट जास्त रक्कम भारताला मिळणार –

या प्रस्तावित मॉडेलमध्ये ईसीबी हे भारतानंतर सर्वाधिक कमाई करणारे क्रिकेट बोर्ड असेल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या एकूण उत्पन्नाच्या ६.८९ टक्के कमवू शकतात. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा नंबर येईल. सीएला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक कमाईच्या ६.२५ टक्के रक्कम मिळणार आहे. दुसरीकडे, एकूण कमाईच्या केवळ ५.७५ टक्के पाकिस्तानला येतील. जिथे भारत वर्षभरात १९०० कोटी कमवेल. त्याच वेळी, पीसीबीची कमाई सुमारे २८३ कोटी असेल. म्हणजेच बीसीसीआयला आयसीसीच्या महसूल पूलमधून पीसीबीपेक्षा ९ पट जास्त रक्कम मिळेल.

हेही वाचा – MI vs RCB: ‘त्याला फॉर्ममध्ये परतण्यासाठी काही चांगल्या…’; रोहित शर्माबद्दल जेसन बेहरेनडॉर्फने दिली प्रतिक्रिया

वार्षिक उत्पन्नाचा हा आकडा आयसीसीच्या अंदाजे कमाईवर आधारित आहे, जी भारतीय बाजारपेठेसह जागतिक स्तरावर पाच वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विकली गेली. त्या पैशाचा मोठा भाग भारतीय बाजारपेठेतील मीडिया हक्कांच्या विक्रीतून आला आहे. डिस्ने स्टारने अलीकडेच ४ वर्षांसाठी मीडिया हक्क विकत घेतले आहेत. आयसीसीच्या एका टीमने प्रस्तावित महसूल मॉडेल तयार केले होते. मार्चमध्ये आयसीसी बोर्डाने चर्चा करण्यापूर्वी वित्त आणि व्यावसायिक व्यवहार (F&CA) समितीने यावर काम केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci will benefit 9 times more than pcb from iccs revenue distribution model vbm
Show comments