भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवरील बंदी उठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोणतेही भाष्य व्यक्त करण्याचे टाळले आहे.
कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी आम्ही न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करू, असे धोरण बीसीसीआयने स्वीकारले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाविषयी आमच्या कायदे समितीकडून मत मिळाल्यानंतरच आम्ही प्रतिक्रिया नोंदवू, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.

Story img Loader