BCCIमधील एका महिला कर्मचाऱ्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक शोषण केले असून प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याचे लैगिंक शोषण केले आहे. हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही त्यावर काही कारवाई केली नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य कुमार यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आरोपीचे नाव लिहिलेले नाही, पण त्यांनी पत्रात एक अनुचित प्रकार घडला असल्याचे नमूद केले आहे. या पत्रामध्ये आदित्य यांनी राय यांच्यावरही टीका केली आहे.

BCCIमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याचे लैगिंक शोषण केले आहे. या प्रकरणाबाबत तुम्हाला कल्पना आहे. परंतु तुम्हाला हे माहिती असून देखील तुम्ही त्या व्यक्तीवर काहीही कारवाई कलेली नाही. तुम्ही अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नका. कारण असे केल्यास हे प्रकरण दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, असा त्याचा अर्थ काढला जाईल.

याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारच्या कृतींसाठी ‘विशाखा’ मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्या तत्वांचा वापर करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.