श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरनसाठी भारत दुसऱया घरासारखे आहे कारण, मुरलीधरनची पत्नी मूळची चेन्नईतील आहे आणि त्यात बंगाल क्रिकेट असोसिएशन संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी देखील मुरलीधरनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने इंडियन एक्स्प्रेसने मुरली धरनची सविस्तर मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने भारतीय क्रिकेट संघाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच अनेक प्रश्नांची सखोलरित्या उत्तरेही दिली.
बंगाल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी तुझ्याकडे कोणी विचारणा केली असल्याचे विचारले असता मुरलीधरन म्हणाला की, सौरव गांगुलीने माझ्याशी संपर्क साधला आणि प्रशिक्षक होशील का? असे विचारले तेव्हा युवा खेळाडूंसोबत वेळ घालविता येईल याविचाराने मी होकार दिला.
भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विनबद्दल बोलताना मुरलीधरन म्हणाला की, अश्विन सध्याच्या उत्कृष्ट फिरकीपटू आहे. त्याच्याविरुद्ध खेळताना फलंदाजांनी संयम बाळगला पाहिजे. अश्विनच्या गोलंदाजीत विविधता आहे आणि याची महत्वाच्या वेळी नक्की गरज भासते. टी-२० सामन्यांत आर.अश्विन भारतीय संघाकडून महत्वाची कामगिरी साकारू शकतो.

Story img Loader