सायकल शर्यतींमधील माजी विश्वविजेता फिलिपी गिलबर्ट याच्यावर मद्यपी चालकाने हल्ला केला. त्यामध्ये गिलबर्टच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. नियमित सरावाच्या वेळी ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गिलबर्ट व त्याचा सहकारी लोईक व्हिलीगेन हे येथे सराव करीत असताना एका मोटारीत बसलेल्या दोन मद्यपी चालकांनी त्यांच्या मोटारीपाशी आपली मोटार नेली. त्यातील एक चालक मोटारीबाहेर आला आणि त्याने गिलबर्टवर हल्ला केला. त्याने केलेल्या मारहाणीत गिलबर्टच्या हाताचे बोट मोडले आहे. या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

गिलबर्ट म्हणाला, बोट फ्रॅक्चर झाले याचे दु:ख मला वाटत नाही, मात्र ज्या प्रकारे हा हल्ला झाला त्याचेच मला जास्त आश्चर्य वाटले.

गिलबर्टच्या बीएमसी संघाचे वैद्यकीय तज्ज्ञ मॅक्स टेस्टो यांनी सांगितले, गिलबर्टची दुखापत फारशी गंभीर नाही. तो दोन दिवसांनी शर्यत करू शकेल. सुदैवाने लोईक याला कोणतीही इजा झालेली नाही.

बेल्जियन पोलिसांनी दोन्ही मद्यपी चालकांना ताब्यात घेतले व त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.