इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम पाच महिन्यांसाठी पॅरिस सेंट जर्मेन क्लबशी करारबद्ध झाला असून, तो आपले संपूर्ण मानधन लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला सुपूर्द करणार आहे. अनेक क्लबचे प्रस्ताव धुडकावून लावत बेकहॅमने पॅरिस सेंट जर्मेनसाठी फुकटात खेळण्याचे ठरवले आहे. मात्र मानधनाची रक्कम आणि स्वयंसेवी संस्थेचे नाव उघड करण्यास बेकहॅमने नकार दिला. ‘‘३७व्या वर्षांतही अनेक क्लबचे प्रस्ताव माझ्यासमोर होते, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. ज्या क्लबतर्फे मी खेळलो, त्या क्लबला मी यशाच्या शिखरावर आणून ठेवले. स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याची सुरुवातीपासूनच माझी इच्छा होती. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला,’’ असे बेकहॅमने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा