पीटीआय, दोहा (कतार) : रविवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये बिअर विक्रीस संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धा सुरू होण्यास ४८ तास बाकी असताना अचानक निर्णय बदलल्यामुळे हजारो मद्यप्रेमी प्रेक्षक नाराज झाले आहेत. ‘विश्वचषक स्पर्धेच्या यजमान देशाचे प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर स्टेडिअममध्ये बिअरची विक्री करण्यास संपूर्ण बंदी करण्यात आली आहे,’ असे फिफाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. स्टेडिअममधील महागडय़ा ‘लक्झरी’ भागामध्ये शँपेन, वाईन, व्हिस्कीसह अन्य अल्कोहोलयुक्त पेये दिली जाणार असली तरी सर्व आठ मैदानांवरील सर्वसामान्य तिकिटधारकांना केवळ अल्कोहोलविरहीत शीतपेयांवर समाधान मानावे लागणार आहे.

‘बडवायझर’ बिअर तयार करणारी कंपनी, ‘एबी इनबेव’ने १९८६ साली ‘फिफा’ सोबत करार केला आहे. त्यानुसार विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये मद्यविक्रीचे अधिकृत हक्क कंपनीकडे आहेत. त्याच्या मोबदल्यात कंपनी ‘फिफा’ला अब्जावधी डॉलर देते. कतारने विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी जेव्हा आपली निविदा सादर केली तेव्हा आणि करार केला तेव्हाही ‘फिफा’चे सर्व व्यावसायिक करार स्वीकारले होते. त्यानंतर दिसणार नाही अशा ठिकाणी बडवायझरला स्टॉल लावण्याची परवानगीही देण्यात आली होती. त्यासाठी कंपनीने बडवायझरचा मोठा साठा लंडन येथून कतारमध्ये पाठवला आहे. मात्र, आता कतारने अचानक आपली भूमिका बदलल्यामुळे मद्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. ‘मद्यपान न करणाऱ्यांना फरक पडणार नाही. पण ऐनवेळी असा निर्णय घेणे धोक्याचा इशारा आहे. दिलेल्या शब्दाला काही किंमत आहे की नाही,’ असा सवाल फुटबॉल सपोर्टर्स युरोप या गटाचे महासंचालक रोनान एविन यांनी केला. ‘एबी इनवेब’ आणि कतार प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे ‘असोसिएटेड प्रेस’ने म्हटले आहे.

Rahul Dravid appointed head coach of Rajasthan Royals
Rahul Dravid IPL 2025 : राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन, ‘या’ संघाला १६ वर्षानंतर ट्रॉफी जिकून देण्यासाठी सज्ज!
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Ravichandran Ashwin on Rohit Sharma about IPL 2025
रोहित IPL 2025 मध्ये मुंबईकडून खेळणार की नाही? अश्विनने दिले उत्तर; म्हणाला, ‘तो अशा खेळाडूंपैकी आहे जे…’
Duleep Trophy 2024 Mohammed Siraj Umran Malik Out Due To Illness and Ravindra Jadeja Released
Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघातील ३ खेळाडूंना केलं रिलीज, काय आहे कारण?
Neeraj Chopra Diamond League Live Streaming Details in Marathi
Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा आज पुन्हा उतरणार मैदानात, डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार?
analysis of world politics play for olympic games
ऑलिम्पिक खेळांच्या मैदानात राजकारणाचा ‘खेळ’
bronze medalist wrestler Aman Sehrawat lost 4.6 kg in 10 hours
Aman Sehrawat : अमन सेहरावतने ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्यापूर्वी अवघ्या १० तासात ४.६ किलो वजन कसे घटवले? जाणून घ्या
Mary kom lost two kilos in four hours during the competition in Poland
मेरी कोमने पोलंडमधील स्पर्धेदरम्यान चार तासांत केले दोन किलो वजन कमी! खरंच व्यायाम केल्याने काही तासांत वजन कमी होते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

‘कतार में है’चा प्रत्यय

 २०१४ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत यजमान ब्राझीलला आपल्या नियमात बदल करून स्टेडियममध्ये बिअर विक्रीस परवानगी द्यावी लागली होती. कतारने मात्र ‘फिफा’ला व्यावसायिक करार मोडण्यास भाग पाडले आहे. या देशात एका कुटुंबाची हुकुमशाही सत्ता असून ‘आमीर’चा शब्द अंतिम असतो. शेजारील सौदी अरेबियाप्रमाणेच कतारमध्ये पुराणमतवादी वहाबी पंथाचा पगडा असला तरी हॉटेल, बारमध्ये मद्यविक्रीस अनेक वर्षांपासून परवानगी आहे.