ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार टॉम मूडी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. रवी शास्त्रींना इतर स्पर्धकांच्या तुलनेत मूडीचे मोठे आव्हान असेल. मात्र, सध्या रवी शास्त्रींचे हे आव्हान काही प्रमाणात कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत बीसीसीआयची बैठक सुरु असताना टॉम मूडी यांची बांगलादेश प्रीमिअर लीगमधील एका संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याचे समोर आले आहे.

बांगलादेशमध्ये रंगणाऱ्या स्पर्धेतील रंगपूर रायडर्स संघ त्यांच्याशी तीन वर्षांचा करार करणार आहे. क्रिकेट वर्तुळात रंगणाऱ्या चर्चेनुसार आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्रशिक्षकाची धुरा सांभाळणाऱ्या टॉम मूडी हे बांगलादेश प्रिमियर लीगमधील (बीपीएल) रंगपूर रायडर्स संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रंगपूर रायडर्सचे सीईओ इशतियाक सदिकने या चर्चेला दुजोरा दिला आहे. सदिक यांनी दिलेल्या माहीतीनुसार, टॉम मूडी यांच्यासोबत तीन वर्षांचा करार करण्यात येणार आहे. प्रिमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्स संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळवून देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, लवकरच मूडी करारावर हस्ताक्षर करणार असल्याचे ते म्हणाले.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kevin Pietersen is available to become the batting coach of the Team India his post viral on social media
Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल
Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
minister ashish shelar criticized sharad pawar over conflict in mva
शरद पवारांच्या राजकीय ऱ्हासाला सुरुवात : आशिष शेलार
Sudhir Mungantiwar absent chandrapur Chief minister Devendra Fadnavis program
निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना ऑफर दिली होती का? अजित पवार स्पष्टच बोलले, “आम्ही…”

टॉम मूडी यांनी भारतीय मुख्य प्रशिक्षक पदासाठी देखील अर्ज केला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली नाही तर ते बांगलादेशच्या मैदानात मार्गदर्शन करताना दिसतील. भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड ही पुढील दोन वर्षांसाठी करण्यात येणार आहे. टॉम मूडी यांनी बांगलादेश प्रिमियर लीगमधील संघाशी अद्याप करार केला नसला तरी बीसीसीआयने संधी दिली नाही तर ते बांगलादेशला कुच करण्यास सज्ज असतील, असेच म्हणावे लागेल.

Story img Loader