आयपीएल स्पर्धेदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याच्या सोशल मीडियावरील पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसीम जाफर प्रश्नात्मक पोस्ट करत चाहत्यांना कोड्यात टाकत आहे. चाहतेही त्या पोस्टला मजेशीर उत्तरं देत आहेत. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यापूर्वी त्याने फ्लेमिंगोचा फोटो ट्वीट करत या खेळाडूचं नाव काय असा प्रश्न विचारला होता. आता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यापूर्वी पुन्हा एकदा कोड्यात टाकणारं ट्वीट केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी जाफरने चाहत्यांना दोन खेळाडू निवडण्यासाठी कोडं टाकलं आहे. हे कोडं लवकर सोडवा असं आव्हानही त्याने केलं आहे. संध्याकाळी दोन खेळाडूंची नावं जाहीर करेन असंही त्याने सांगितलं आहे.
Picking 2 players to watch out for tonight. I’ll reveal the names in the evening, but let’s see how many decode it before that #CSKvDC #IPL2021 pic.twitter.com/sBGOhnbvw0
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 10, 2021
जाफरने ट्विट केलेल्या फोटोचे दोन भाग केले आहेत. एका बाजूला ‘एडिट करके तुने इमेज मेरा मेमे बना दिया, मेहनत करके तेरे भाई ने पुरा ड्रीम बना दिया’ असं लिहिलं आहे. तर दूसऱ्या बाजुला ‘HUGSY’असं इंग्रजीत लिहून पेंग्विनचं कार्टून पोस्ट केले आहे. त्यामुळे आता हे दोन खेळाडू कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेक जण कमेंट्समध्ये क्रिकेटपटूंची नावे लिहीत आहेत. मात्र खरं उत्तर जाफर सांगेल तेव्हाच कळणार आहे.
Well done to those who got it right. My player to watch out for is indeed @trent_boult. Who’s yours? #MIvsRCB #IPL2021 https://t.co/LjkxgD1zhr pic.twitter.com/fC8AqfToai
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 9, 2021
यापूर्वी जाफरने फ्लेमिंगोचा फोटो ट्वीट केला होता आणि हा खेळाडू कोण असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी हा खेळाडू वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट असल्याचं त्याने जाहीर केलं आणि कोड्यात पडलेल्या चाहत्यांना उत्तर मिळालं.