भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळला जाणार आहे. मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल जॉन्सनने आपल्या संघाला विजयाचा कानमंत्र दिला आहे. त्याने म्हटले आहे की, ‘ऑस्ट्रेलियन संघाने टर्निंग ट्रॅकवर प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारली, तर त्यामुळे भारतीय संघावर मोठा दबाव निर्माण होईल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आपली पकड मजबूत करू शकेल’.
मिचेल जॉन्सन वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी त्यांच्या कॉलममध्ये लिहिले, ”या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करण्यात यशस्वी झाला, तर तिथे फिरकीपटूंची मदत मिळणे आणि पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारणे अपेक्षित आहे. कारण त्यामुळे भारतावर दडपण निर्माण करता येईल.” यावरून स्पष्ट होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने मोठे लक्ष्य ठेवले पाहिजे असे विधान केले. त्यामुळे गोलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी मिळेल आणि भारत बॅकफूटवर जाईल.
भारतीय फलंदाज फिरकीपटूंचा चांगल्या प्रकारे सामना करतात –
मिचेल जॉन्सनने आपल्या वक्तव्यात असेही म्हटले आहे की, ‘ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी चार फिरकीपटू घेतले आहेत, भारतीय फलंदाज नॅथन लायनचा अनुभव आणि कसोटी विक्रम लक्षात घेऊन त्यांचा आदर करतील, तर बाकीच्या फिरकीपटूंना ते तितकसे घाबरणार नाहीत. कारण भारतीय फलंदाज आपल्या पायांचा चांगला वापर करुन फिरकीचा सामना करतात.”
हेही वाचा – टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी Sanju Samson सज्ज…! मैदानावर फुल इंटेनसिटीने गाळतोय घाम, पाहा VIDEO
कांगारू संघाने स्थानिक गोलंदाजांचा घेतला आधार –
४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी कांगारू अलूरमध्ये सराव शिबिर लावून सराव करत आहेत. जिथे पाहुणा संघ फिरकीपटूंविरुद्ध तयारी करत आहे. यासाठी कांगारू संघाने स्थानिक गोलंदाजांचा आधार घेतला आहे.
हेही वाचा – Deepak Chahar: CSK चा स्टार खेळाडू गंगेच्या काठावर पत्नीसोबत करतोय योगा आणि व्यायाम; पाहा VIDEO
भारतीय कसोटी संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.