IND vs AFG, World Cup: एकतर्फी विजयाची नोंद करण्याच्या इराद्याने भारतीय संघ बुधवारी विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानशी भिडणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी संघाच्या तयारीबाबत तसेच डेंग्यूने त्रस्त असलेल्या भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा केला आहे. भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले की, “गिल अजूनही चेन्नईत आहे आणि त्याच्या प्लेटलेट्सची संख्या १,००,०००च्या खाली गेल्याने त्याला यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु आता तो सध्यातरी बरा असून हॉटेलमध्ये परतला आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.”

पुढे राठोड म्हणाले, “शुबमन गिल हा भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु हा स्टार सलामीवीर फलंदाज त्याच्या आजारपणामुळे चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या सामन्यातून बाहेर पडला होता. यामुळे त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली होती.” विक्रम राठोड म्हणाले, “त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होत मात्र, तो हॉटेलमध्ये परतला आहे. चेन्नईतील वैद्यकीय पथक त्याच्यावर नजर ठेवत आहे. लवकरच तो संघात परतेल असा आम्हाला विश्वास आहे.”

Sunil Gavaskar Statement on Concussion Substitute Shivam Dube Harshit Rana
IND Vs ENG: “शिवम दुबेच्या डोक्याला दुखापत झाली नव्हती, मग…”, सुनील गावस्करांचं कनक्शन सबस्टीट्यूटबाबत मोठं वक्तव्य; टीम इंडियाला सुनावलं
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
Jos Buttler Statement on Harshit Rana Concussion Substitute Controversy IND vs ENG
IND vs ENG: “आम्ही सामना जिंकणं अपेक्षित…”, जोस बटलरचं हर्षित राणाच्या खेळण्याबाबत मोठं वक्तव्य, सामन्यानंतर राणा-दुबेबाबत पाहा काय म्हणाला?
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
IND vs ENG Abhishek Sharma Credits Gautam Gambhir and Suryakumar Yadav's Backing For His Return To Form
IND vs ENG : ‘मला पूर्ण स्वातंत्र्य दिले…’, अभिषेक शर्माने आपल्या वादळी खेळीचे श्रेय कोणाला दिले? जाणून घ्या
IND vs ENG 1st T20I Abhishek Sharma half-century helps India beat England by 7 wickets in Eden Gardens
IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा खास विक्रम, कोलकात्यात साकारली स्फोटक खेळी
IND vs ENG Aakash Chopra Warns Abhishek Sharma Of Last Chance against England T20Is Series
IND vs ENG : ‘अभिषेक शर्माला शेवटची संधी…’, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी माजी भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य

भारतीय संघाच्या तयारीबद्दल बोलताना विक्रम राठौर म्हणाले, “फक्त कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हाच आमचा सर्व खेळाडूंना संदेश असून त्यांनी त्यांचा खेळ योग्य प्रकारे खेळायचा पाहिजे. टीम इंडिया हा एक मजबूत संघ आहे जो योग्य निकाल देईल.” सराव सत्रानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: World Cup 2023: इंग्लंडचा कर्णधार BCCIवर भडकला, धरमशालाच्या आउटफिल्डवर बोलताना म्हणाला, “यावर क्षेत्ररक्षण करणे म्हणजे…”

दुसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या इशान किशनबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना विक्रम राठोड म्हणाले, “हा फॉरमॅट कसा खेळायचा हे प्रत्येकाला माहीत आहे. संघातील प्रत्येकाला स्वातंत्र्य देत आहोत, प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी आहे, त्यावर विश्वास ठेवावा लागेल. कर्णधार, प्रशिक्षक खेळपट्टी बघून निर्णय घेतील. यावर कोणतीही चर्चा नाही. इशानने भूतकाळात त्याच्या फलंदाजीबाबत खुलासा केला आहे, यावर मला विशेष चर्चा करायची नाही. तो टॉप ऑर्डरवर फलंदाजी करू शकतो. आशा आहे की तो आणखी चांगली फलंदाजी करेल.”

विश्वचषकातील कामगिरी

दुसरीकडे, विश्वचषकातील उभय संघाची कामगिरी पाहायची झाली, तर भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे, भारताचा स्टार सलामीवीर शुबमन गिल आजारी असल्याने त्याला या सामन्यात खेळता आले नव्हते. तसेच, तो अफगाणिस्तानविरुद्धही खेळताना दिसणार नाहीये. अशात इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानने आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. हा सामना बांगलादेशने ६ विकेट्सने जिंकला होता.

खेळपट्टी आणि हवामान

दिल्लीचे अरुण जेटली स्टेडिअम फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी, लहान मैदाना आणि फलंदाजांसाठी वेगवान आऊटफील्डसाठी प्रसिद्ध आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. तसेच, मधल्या षटकात फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात. विश्वचषकातील मागील सामन्यात या मैदानावर दोन डावातील मिळून ७००हून अधिक धावांचा पाऊस पडला होता. दक्षिण आफ्रिकेने ४२८ धावा केल्या होत्या, तर श्रीलंकेने ३२६ धावा केल्या होत्या. अशात या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारली जाण्याची आशा आहे. दवांमुळे कर्णधार नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला पसंती दर्शवतात. हवामानाविषयी बोलायचं झालं, तर वेदरकॉमच्या रिपोर्टनुसार दिल्लीत बुधवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सियस असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नाहीये. मात्र, आकाशात ढग दाटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: PAK vs SL: बाउंड्री लाईन मागे गेल्याने मेंडिसचे विकेट मिळाली? Video व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूवर झाले प्रश्न उपस्थित

विश्वचषकासाठी उभय संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर

अफगाणिस्तान: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

Story img Loader