World Cup 2023, India vs Australia Updates: भारतीय क्रिकेट संघ रविवारी विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याच्यासमोर पहिले आव्हान ऑस्ट्रेलियाचे असणार. हा सामना चेन्नईत होणार आहे. फिरकी गोलंदाज आर अश्विन त्याच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अश्विन केवळ गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीलाही धार लावण्यात व्यस्त आहे. ऑस्ट्रेलियासाठी ही धोक्याची घंटा आहे. आयसीसीनेही एक व्हिडिओ शेअर करून ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे.

अश्विनचा व्हिडीओ व्हायरल –

आयसीसीने रविवारी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा तणाव वाढणार. हा व्हिडीओ भारताच्या सराव सत्राचा आहे, ज्यामध्ये अश्विन फलंदाजी करताना दिसत आहे. एकामागून एक चेंडू तो सीमापार पाठवत होता. जणू काही पूर्णवेळ फलंदाज सराव करत आहे. टीम इंडियाने अश्विनला सलामीला पाठवावे, अशी प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिली.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाचा तणाव वाढला –

अश्विनचा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियासाठी मोठा पेच निर्माण करणारा आहे. मायदेशात अश्विनचा गोलंदाजीचा विक्रमच धडकी भरवणारा नाही, तर त्याची फलंदाजीही ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणू शकते. अश्विनने देशांतर्गत टी-२० लीगमध्येही टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली आहे. एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू म्हणून या स्पर्धेत उतरणार असल्याचे भारतीय फिरकी गोलंदाजाने दाखवून दिले आहे. केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर इतर सर्व संघांनाही अश्विनपासून दूर राहण्याची गरज आहे.

हेही वाचा – World Cup 2023, IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रिडीक्शनसह, जाणून घ्या सर्व काही

वृत्तांवर विश्वास ठेवला तर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची खात्री आहे. चेन्नईच्या खेळपट्टीचा विचार करता अश्विनचे ​​संघात राहणे फायदेशीर ठरू शकते. अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे याचा अर्थ भारत तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल. अश्विनशिवाय कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे देखील संघात असतील.

चेन्नईत अश्विनचा विक्रम –

चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये अश्विनने गोलंदाजी करताना एकूण ५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्ध २ विकेट्स घेतले होते. त्याचबरोबर २०१२ मध्ये त्याला पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट घेण्यात यश आले नव्हते. त्याने येथे तीनपैकी दोन सामन्यांत फलंदाजी केली आहे. यामध्ये अश्विनने ४२ धावा केल्या आहेत.

Story img Loader