Hardik Pandya Injured In Nets Session: भारतीय क्रिकेट संघ रविवारी आपल्या घरच्या मैदानावर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात करत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सामना पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुबमन गिलला डेंग्यू झाल्याची बातमी समोर आली असतानाच अष्टपैलू हार्दिक पांड्या सरावादरम्यान जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सुरू झाला आहे. भारतीय संघ मैदानात उतरण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. टीम इंडिया रविवारी 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वी भारतासाठी वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर शुबमन गिलला डेंग्यूने ग्रासले असून त्याच्या सलामीच्या सामन्यातील सहभागाबाबत साशंकता आहे. त्याचबरोबर आता अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही सरावादरम्यान दुखापत झाल्याची बातमी आहे.
रेव्ह स्पोर्टसच्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना जखमी झाला. फलंदाजीचा सराव करत असलेल्या हार्दिकच्या बोटावर वेगवान चेंडू लागला आणि त्यानंतर त्याने पुढे फलंदाजी केली नाही. मात्र, दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सराव न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – Asian Games: भारतीय पुरुष कबड्डी संघाची कमाल! पाकिस्तानचा ६१-१४ अशा फरकाने धुव्वा उडवत गाठली अंतिम फेरी
शुबमन गिलबद्दल बोलायचे तर, भारताचा सलामीवीर डेंग्यूने ग्रस्त होता आणि बुधवार आणि गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताचे प्रशिक्षण सत्रात सहभागी झाला नाही. टीम मॅनेजमेंटला आशा होती की गिलचा आजार फ्लू व्यतिरिक्त काही नाही, पण क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार तसे झाले नाही. बीसीसीआयने आपल्या अधिकृत अपडेटमध्ये म्हटले आहे की. “वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्हाला आशा आहे की तो लवकरच बरा होईल.”
विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.