ICC Cricket World Cup 2023: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तानचा संघ ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध पहिला साखळी सामना खेळणार आहे. हा सामना हैदराबादमध्ये खेळला जाणार असून या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने संघाची तयारी आणि ताकद याबद्दल सांगितले. बाबर आझमने आपल्या संघाची सर्वात मोठी ताकद काय आहे आणि त्याला काय करायचे आहे हे सांगितले.
पाकिस्तान संघाची सर्वात मोठी ताकद वेगवान गोलंदाजी –
पाकिस्तान क्रिकेटने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बाबर आझम म्हणाला, ‘आमचा सराव खूप चांगला झाला असून आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा आमची ताकद फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आहे, ज्यात आमचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. तसेच आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद वेगवान गोलंदाजी आहे, परंतु आमचे फिरकीपटू देखील कमी नाहीत. आम्ही हा विश्वचषक भारतात खेळत आहोत आणि आम्ही पाहिले आहे की मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू विकेट्स घेत आहेत, त्यामुळे ते खूप चांगले आहे.’
भारतातील खेळपट्टीबद्दल बाबर आझम काय म्हणाला?
खेळपट्टीबद्दल बोलताना बाबर आझम म्हणाला की, ‘येथील खेळपट्टी खूप चांगली आहे जिथे धावा होण्याची शक्यता आहे. येथे धावा काढण्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवावा लागेल. त्यामुळे सेट होणे खूप महत्वाचे आहे कारण त्यानंतर तुम्हाला फलंदाजी करणे खूप सोपे जाते. येथे गोलंदाजीमध्ये फरक नाही आणि तुम्हाला येथे विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल आणि तेही भिन्नतेसह. जर तुम्ही स्टंपच्या बाहेर थोडेसे असाल तर फलंदाज तुमच्यावर वर्चस्व गाजवतात.’
हेही वाचा – World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO
भारतात कोणताही नाही दबाव –
स्टार स्पोर्ट्सवरील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ कॅप्टन डे कार्यक्रमात बोलताना बाबर आझम म्हणाले की, ‘भारतात आमच्यावर कोणतेही दडपण नाही. इथली खेळपट्टी आणि परिस्थिती पाकिस्तान किंवा आशियातील परिस्थितीसारखीच आहे. आम्ही गेल्या एका आठवड्यापासून येथे आहोत आणि आम्ही खेळलेल्या सराव सामन्यांमध्ये कोणताही फरक दिसला नाही. इथे फरक एवढाच आहे की सीमा थोडी लहान आहे आणि गोलंदाजांना बचण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यांनी अचूक गोलंदाजी केली नाही, तर फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. येथे धावा होतील आणि त्यानुसार तुम्हाला खेळावे लागेल.’