Businessman to Gift Virat Kohli a Diamond Studded Bat: भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली हा जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो खेळाचा आधुनिक काळातील युवा खेळाडूंसाठी आदर्श म्हणून ओळखला जातो. देशाच्या किंवा जगाच्या कुठल्याही भागात जरी तो गेला तरी जगभरातील क्रिकेट चाहते वेगवेगळ्या प्रकारे कोहलीबद्दलचे प्रेम दाखवतात. मात्र, विराटसारख्या खास खेळाडूवर प्रेम दाखवण्यासाठी काही चाहते एक अनोखा मार्ग अवलंबतात. अलीकडेच असेच एक उदाहरण पाहायला मिळाले, जेव्हा एका व्यावसायिकाने किंग कोहलीबद्दलचे प्रेम दाखवण्याचा अनोखा मार्ग शोधला. सुरतच्या या व्यावसायिकाची विराटप्रती प्रेम व्यक्त करण्याची पद्धत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूरतमधील एका व्यावसायिकाने विराट कोहलीला १.०४ कॅरेटची हिऱ्याने जडलेली बॅट भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. सुराल व्यवसाय हा विराटचा मोठा चाहता आहे आणि वर्षानुवर्षे विराटला सतत फॉलो करत आहे. ही डायमंडने जडलेली बॅट कोहलीला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी हा उद्योगपती भेट देणार आहे.

हेही वाचा: Pakistan Team: भरघोस पगारवाढीनंतरही बाबर आझमसह पाकिस्तानी संघ PCB नाराज, करार करण्यास नकार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

बॅटची किंमत किती आहे?

भारतीय क्रिकेट संघात १५ वर्षे पूर्ण करणारा विराट कोहली आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेपूर्वी या भेटीतून कोहलीला खूप आत्मविश्वास मिळेल. ही बॅट तयार करण्यासाठी त्याला जवळपास एक महिना लागला. या विशिष्ट बॅटची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे आणि तिचा आकार १५ मिमी ते ५ मिमी पर्यंत आहे. जो व्यक्ती कोहलीला ही बॅट देणार आहे, तो सुरतचा रहिवासी आहे आणि कोहलीचा मोठा चाहता आहे. डायमंड तंत्रज्ञान तज्ञ आणि सुरत येथील लेक्सस सॉफ्टमॅक कंपनीचे संचालक उत्पल मिस्त्री यांनी त्यांच्या देखरेखीखाली ही बॅट बनवली आहे. या अत्यंत महागड्या गिफ्टबद्दल त्याने खुलासा केला आहे.

उत्पल मिस्त्री यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “देशातील सर्वोच्च क्रिकेटपटूला नैसर्गिक हिऱ्याची बॅट भेट द्यायची होती. प्रयोगशाळेत उगवलेला हिरा आणि मशिनशिवाय नैसर्गिक हिरा यातील फरक सांगणे फार कठीण आहे. डोळ्यांनी बघून सांगता येणार नाही.” आता मोठ्या क्रिकेटपटूला हिऱ्याची बॅट भेट देऊ इच्छिणाऱ्या हिरे व्यापाऱ्याने सांगितले की, “तो लॅबमध्ये तयार केलेला हिरा नसून नैसर्गिक हिरा आहे हे पाहूनच कळावे.”

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कपसाठी भारतीय संघाची दिल्लीत होणार निवड! कर्णधार रोहित शर्मा बैठकीला उपस्थित राहणार?

ते पुढे म्हणाले, “बॅटची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे आणि आकार १५ मिमी बाय ५ मिमी आहे, म्हणून आम्हाला वाटले की देवाने तयार केलेली नैसर्गिक हिऱ्याची चमक ही प्रयोगशाळेत तयार केलेल्या डायमंड स्क्रीनशी तंतोतंत जुळत नाही. त्यामुळे आमच्या मनात ही कल्पना आली आणि आम्ही रफ डायमंडची चमक पॉलिश होईपर्यंत ठेवली. आम्हाला कोहलीला कृत्रिम हिऱ्याची नव्हे तर नैसर्गिक हिऱ्याची बॅट भेट द्यायची होती. पण ती खरी वाटेल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.”