Rohit Sharma on Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह कधी पुनरागमन करणार? भारतीय क्रिकेटमध्ये हा मोठा प्रश्न आहे. याविषयी अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. पण त्या शक्यतांमध्ये किती तथ्य आहे? हाही तितकाच मोठा प्रश्न आहे. दुखापतीनंतर बुमराहच्या टीम इंडियात पुनरागमन करण्याबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती आलेली नाही. कर्णधार रोहित शर्मालाही कळत नाहीये की बुमराह कधी परततोय? म्हणूनच त्याच्या आयर्लंड दौऱ्याच्या प्रश्नावर तो थेट बोलला, “मला माहीत नाही.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. रोहित म्हणतो की, “बुमराह आयर्लंड दौऱ्यावर जाईल की नाही हे मला अद्याप माहित नाही, पण संघाच्या दृष्टिकोनातून तो २०२३च्या विश्वचषकापूर्वी जास्तीत जास्त सामने खेळेल हे खूप चांगले होईल.” माहितीसाठी, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बुमराहने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर तो दुखापतीमुळे टीम इंडियापासून लांब आहे. शस्त्रक्रियेनंतर, तो एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर सतत काम करत आहे आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी तो पुनरागमन करू शकेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: IND vs WI 1st ODI: संजू सॅमसन की सूर्यकुमार? वेस्ट इंडीजविरुद्ध प्लेईंग ११ निवडण्याचे रोहित शर्मासमोर असेल आव्हान, जाणून घ्या

जसप्रीत बुमराहसाठी मॅच प्रॅक्टिस महत्वाची- रोहित शर्मा

कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “वर्ल्डकप सोडा आयर्लंडविरुद्ध तरी किती सामने खेळतो? हे पाहणे गरजेचे आहे. जर त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली तर ती भारतासाठी चांगली गोष्ट असेल. विश्वचषकापूर्वी त्याला जास्तीत जास्त सामने खेळवण्याचा आमचा प्रयत्न असेल, ते संघासाठी चांगले होईल. एवढ्या मोठ्या दुखापतीनंतर जेव्हा तुम्ही पुनरागमन करता तेव्हा मॅच फिटनेस आणि मॅच फीलिंगचा खूप अभाव असतो. त्यामुळे जर तो सामना खेळला तर त्याचे आणि संघाचेही भले होईल.”

पुढे रोहित म्हणाला की, “ जसप्रीत बुमराहसाठी मॅच प्रॅक्टिस महत्वाची आहे. तो एका महिन्यात किती सामने खेळतो ते पाहणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी काय योजना आहेत? तो किती बरा झाला? आधी या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहेत. आम्ही एन.सी.ए.च्या सतत संपर्कात आहोत, गोष्टी सकारात्मक होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.”

हेही वाचा: IND vs WI ODI: कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेत भारतासमोर कॅरेबियन संघाचे आव्हान, येथे पाहू शकता सामना विनामूल्य

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. यानंतर, आशिया चषक स्पर्धेत एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी संघाला वेळ मिळेल, तसेच, ऑस्ट्रेलियन संघ या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारताचा दौरा करणार आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहने या काळात जास्तीत जास्त सामने खेळावेत, अशी भारतीय संघाची इच्छा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before west indies odi series start rohit sharma gave an update on jasprit bumrahs comeback i dont know yet avw