Mohammad Kaif on Virat Kohli and Cheteshwar Pujara: ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर २०२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. या मोठ्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाच्या झालेल्या चुकांची खूप चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही विराट कोहलीच्या क्षेत्ररक्षणातील त्रुटींकडे लक्ष वेधले आहे आणि त्याच्या चुका मोजल्या आहेत.

टीम इंडियाच्या पराभवानंतर भारतीय संघाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर टीका होत आहे. असे बोलले जात आहे की जर भारतीय खेळाडूंनी काही झेल सोडले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मोहमद कैफने फायनलनंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. टीम इंडियाला स्लिप फिल्डिंगवर काम करण्याची गरज असल्याचे कैफचे मत आहे. माहितीसाठी! कैफ हा त्याच्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताने ॲलेक्स कॅरी (६६) याचा स्लिपमध्ये एक सोपा झेल सोडला. हा झेल कोहली आणि पुजारा यांच्यात गेला. कॅरी ४१ धावांवर असताना त्याच्या बॅटला चेंडू लागून तो स्लिपमध्ये गेला पण दोन्ही क्षेत्ररक्षक या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत. चेंडू कोहली आणि पुजाराच्या टप्प्यात होता मात्र, ते दोघे नुसते कोण पहिला झेल घेणार हा विचार करीत पाहत बसले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी झालेल्या संभाषणात याविषयी आपले मत मांडताना कैफ म्हणाला की, “मैदानात उतरण्यापूर्वी या गोष्टींचा ऊहापोह करायचा असतो. अशी संधी आपण गमावू शकत नाही, खेळाडूंना आळशी राहून चालणार नाही.”

पुढे बोलताना कैफ म्हणाला की, “अशी चूक दिग्गज खेळाडूंकडून होते याचे मला आश्चर्य वाटते. विराटने जर असा आळशीपणा केला नसता तर त्याचे पडसाद त्याच्या फलंदाजीत दिसले नसते. अशा क्षणी क्षेत्ररक्षकाला वाटले असेल की स्लिपमधील झेल येणार नाहीत पण हा खेळाचा एक महत्त्वाचा टप्पा होता जिथे भारताला अशा प्रकारच्या संधी गमावणे परवडणारे नव्हते.”

हेही वाचा: MS Dhoni: एम.एस. धोनी आयपीएलला अलविदा करणार? CSKने शेअर केलेल्या ३३ सेकंदाच्या Videoने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले

क्षेत्ररक्षण करताना ट्रॉझर्सखाली शिन पॅड घातल्याबद्दल कैफने पुजारावर टीका केली. त्यामुळे क्षेत्ररक्षकाचे नुकसान होते, असे तो म्हणाला. कैफ म्हणाला, “शिन पॅड्समुळे तुमची हालचाल कमी होते आणि तुम्ही नीट वाकू शकत नाही. मला वाटते की त्याचा परिणाम झेल सोडण्यावर झाला असेल.” कैफने असेही नमूद केले की, “जर इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीत सामना खेळला जात असेल, तर तुम्ही गुड लेंथवरून उसळी आणि वेगाने चेंडू येणार हे आधी डोक्यात ठेवा. त्यामुळे स्लिप क्षेत्ररक्षक नेहमी गेममध्ये असतो, असे लक्ष विचलित करून चालणार नाही.”

तो पुढे म्हणाला, “हाफ चान्सचा फायदा करून असेच सामने तुम्ही जिंकू शकता. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने अशीच संधी दिली होती पण चेंडू कोहलीच्या हातून दूर गेला. ऑस्ट्रेलियन संघ १९० धावांवर होता तेव्हा स्मिथ आऊट झाला असता तर काय झाले असते कुणास ठाऊक. महत्त्वाची बाब म्हणजे त्यानंतर स्मिथने पहिल्या डावात १२१ धावा केल्या होत्या. तसेच, त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत चौथ्या विकेटसाठी २८५ धावांची भागीदारी केली, ज्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही.”

हेही वाचा: WTC 2023 Final: सुनील गावसकरांची भारतीय संघावर सडकून टीका; म्हणाले, “आता काय आम्ही वेस्ट इंडीज २-०, ३-०ने…”, Video व्हायरल

कैफ म्हणाला, “इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये, जिथे बाऊन्स असतो, तिथे स्लिप फिल्डर स्टम्पच्या जवळपास २५ यार्ड मागे उभा असतो. आशियामध्ये तुम्ही फलंदाजाच्या खूप जवळ उभे राहता. त्यामुळे कोहलीसारख्या खेळाडूला कुठे उभे राहायचे आहे हे कळले पाहिजे. तरच अशा प्रकारच्या संधींचा फायदा उठवू शकता.”