बेल्जियम संघाने तुल्यबळ अमेरिका संघावर बाद फेरीत २-१ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
बाद फेरीतील हा सामना देखील निर्धारित वेळ संपेपर्यंत बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांना ९० मिनिटांचा खेळ संपेपर्यंत एकही गोल करता आला नव्हता. त्यामुळे ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ घेण्यात आला आणि यामध्येच बेल्जियमने आक्रमक खेळी करत दोन शानदार गोल केले.
सामन्याच्या ९३ व्या मिनिटाला बेल्जियमच्या डी ब्य्रुयने याने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १०५ व्या मिनिटाला लुकाकूने दुसरा गोल करत बेल्जियमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर १०७ व्या मिनिटाला अमेरिकेकडून ग्रीनने गोल करुन आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला परंतु, अतिरिक्त वेळ संपेपर्यंत बेल्जियमची बचाव फळी भेदून अमेरिकेला बरोबरी साधण्यात अपयश आले आणि बेल्जियमचे उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट पक्के झाले.

Story img Loader